IIT Mumbai : प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द, विद्यार्थी संघटनांनी नोंदवला निषेध
IIT Mumbai Ganesh Devy's Lecture Cancelled : प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे आयआयटी मुंबईमध्ये नियोजित व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला आहे.
Mumbai News : आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी (Ganesh Devy) यांचे व्याख्यान (Lecture) अचानक रद्द केल्याने विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला आहे. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या विद्यार्थी संघटनेकडून या सगळ्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत व्याख्यानाच्या सामूहिक वाचनासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आला आहे. मुंबई आयआयटीमध्ये प्रख्यात भाषा तज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यानाचे 31 जानेवारीला आयोजित करण्यात आले होते. मात्र, अचानक रद्द करत असल्याचे ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात आलं आहे.
प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द
प्रा. गणेश देवी हे 'द क्रायसिस इन इंडिया', या विषयावर बोलणार होते. आयआयटीतील व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते. यासाठी देवी यांना दोन महिन्यांपूर्वी विचारणा करण्यात आली होती, तर व्याख्यानाचा विषय महिनाभरापूर्वी निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे. व्याख्यानाच्या विषयावरून होणाऱ्या वादामुळे आयआयटीने काही दिवसांपूर्वी व्याख्यानांचे विषय मंजूर करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने हे व्याख्यान रद्द केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विद्यार्थी संघटनांनी नोंदवला निषेध
या प्रकारचा निषेध म्हणून मुंबई आयआयटीतील विद्यार्थी बुधवारी देवी यांनी लिहिलेल्या संबंधित व्याख्यानाचे वाचन आयआयटीत करणार आहेत. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या संघटनेकडून या सगळ्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाच्या वाचनासाठी एकत्र यावे, असं आवाहन केलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI