Online school | पालक, विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची उत्तरे
आजपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तरे दिली आहेत.
मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्या नसल्या तरी आजपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मुलांना शाळेत जायला मिळणार नाही का? ऑनलाईन शिक्षण किती दिवस चालणार? प्रत्यक्षात शाळा कधी उघडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
ऑनलाईन शाळा?
आज शाळा सुरू होतायत. मात्र, आज मुलांना वेगळ्या माध्यमातून भेटत आहोत. कोरोनामुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत. मात्र, ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू राहणार आहेत
ऑनलाइन आम्ही शिकत आहोत. परंतु, हे किती दिवस चालेल?
सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या शाळा सुरू करता येणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आहे. ती आपली पहिली प्रायोरिटी आहे. परिस्थिती निवळली की शाळा सुरू होईल. टास्क फोर्स सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती सुधारली की दहावी बारावी सुरू होईल.
टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार का?
सर्व शाळा मागील काळात देखील आपण सुरू केल्या नव्हत्या. मागे देखील आपण 9वी, 10वी, 12वी टप्प्याटप्प्याने सुरू केली. येणाऱ्या काळात देखील असाच निर्णय घेतला जाईल.
गणित विषय सायन्स विषय ऑनलाइन शिकता येत नाही?
असे विषय शिकताना मुलांना अडचणी येत आहेत. मात्र, अशी परिस्थिती येईल याची कुणीच कल्पना केली नव्हती. माझी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नंबर विद्यार्थ्यांना द्यावेत याशिवाय शिक्षण विभागाने देखील काही तज्ज्ञ नेमले आहेत. त्यांचे देखील नंबर द्यावेत. जेणेकरुन शंका निरसन होईल
मागील वर्गातील संकल्पना क्लिअर झाले नाहीत मग पुढील वर्गातील कन्सेप्ट कशा कळणार?
शाळा सुरू झाल्यानंतर ब्रिज कोर्स होणार आहेत. त्यामुळे मागील वर्गातील अभ्यासाची उजळणी होईल. 1 ऑगस्टपासून मुलांना नवीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होईल. यासाठी आम्ही दीड महिन्याचा कालावधी ठरवला आहे.
यंदाच्या वर्षी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही असाईनमेंट करणार आहोत. प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांचं आम्ही इव्यल्युएशन करणार आहोत आणि त्याची नोंद ठेवली जाईल. त्याचे मार्क शिक्षण विभागाकडे जातील. यंदाचं वर्ष हे खूप वेगळं असेल. मागील वर्ष आणि यंदाचं वर्ष यांच्यामध्ये ब्रिज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोप्प्या कंटेंटची लिंक देखील आम्ही विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
अभ्यासक्रम कमी होणार आहे का?
याच्यावर आमची चर्चा सुरू आहे. सध्या अभ्याक्रम कमी करण्याची गरज नाही. परंतु, जर परिस्थिती सुधारली नाही तर मात्र अभ्यासक्रम कमी होईल. याबाबत सध्या तरी वेट अँड वॉच सुरू आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सावध पवित्रा घेतला आहे. पुढील 10 ते 15 दिवसांत याबाबत निर्णय जाहीर करू.
शाळा सुरू केल्या तर त्या कशा पद्धतीने सुरू होतील?
शाळा निर्जंतुकिकरण करणं असेल, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्स मेंटेट करणं या बाबी असतील. याबाबतची एसओपी देखील देण्यात येणार आहे.
आणखी किती दिवस ऑनलाईन शिक्षण असेल?
काळजी घेणं हे पहिलं काम आहे. आम्ही कुठलाही निर्णय घेताना खूप विचार करतो. अनेक तज्ज्ञांशी बोलतो आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेत असतो. शाळा येणाऱ्या काळात लवकरच सुरू होतील.
आम्ही शाळेत जायला तयार आहोत. परंतु, पालक मात्र शाळेत पाठवायला तयार नाहीत
आम्हाला तुम्हाला पालक म्हणून सुरक्षित वातावरण द्यायचं आहे. अनेक लोकांनी कोरोनाशी दोन हात केले आहेत. त्यामुळे पालकांना विनंती आहे की चिंता करू नका. आम्ही अनेकांशी बोलून संयमाने निर्णय घेत आहोत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI