आधार कार्ड असताना विद्यार्थ्यांसाठी अपार ID महत्त्वाचा कशासाठी ? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं ..
बहुतेक लोक कामाच्या ठिकाणी जातील परंतु आज जेव्हा आपण शालेय शिक्षणाकडे पाहतो त्यावेळेस शाळा सोडण्याचे प्रमाण सुमारे 40% एवढ आहे .

Dharmendra Pradhan: आपल्या देशात विविध मुद्द्यांवर सतत चर्चा सुरू असते आणि बहुतेक लोकांना त्यात तरच असतो. पण शिक्षण क्षेत्राबद्दल बोलणारे लोक खूप कमी आहेत त्यामुळेच एबीपी न्यूजने एक शिक्षण परिषद आयोजित केली होती. जात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या एकूणच शिक्षणाच्या विविध पैलूंवर संवाद साधलाय. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर काय बदल होतील हे त्यांनी सांगितलं. शिक्षणव्यवस्थेसमोरच आव्हान नक्की काय आहे? मुलांच्या सुरुवातीच्या काळात मातृभाषेत शिक्षण घेणं हे किती मूलभूत आणि गरजेचे आहे? दोनदा बोर्ड परीक्षा घेण्यामागचं नक्की कारण काय? अशा अनेक विषयांवर ते बोलले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले,"माझ्यासाठी हा अतिशय आनंददायी योगायोग आहे. गेल्या चार वर्षांपासून मी शिक्षण खात्याच्या पदावर आहे. आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. भारतीय जुनी संस्कृती आहे. आपल्या देशात असं हे असं क्षेत्र आहे जात अनेक काळापासून कमतरता भासत आली आहे. आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक आव्हानांचा आपल्याला सातत्याने सामना करावा लागला आहे."
राष्ट्रीय शिक्षण धोरणावर काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राष्ट्रीय शिक्षण धोरणावर बोलताना म्हणाले, आम्ही अशा गोष्टींना प्राधान्य दिलं आहे, जे पूर्वी दिले जात नव्हतं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशी शिफारस करण्यात आली होती की ज्यामुळे सहावीपर्यंत मुलांचा मानसिक विकास होतो. पहिल्यांदाच यावर काम केलं जात आहे. मुलांच्या बालपणाच्या शिक्षणावर काम केले जात आहे. पूर्वी बालवाटी का होत्या प्ले स्कूल देखील होते पण आता तीन वर्षांच्या मुलाला एका प्रणालीशी जोडला जाईल. आणि हे वेगवेगळ्या टप्प्यात राबवले जाणार आहे.
शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं प्रत्येक जण आयआयटी मध्ये जाणार नाही .प्रत्येक जण नीट परीक्षा देऊन डॉक्टर होणार नाही .प्रत्येक जण संशोधनाकडे जाणार नाही .बहुतेक लोक कामाच्या ठिकाणी जातील परंतु आज जेव्हा आपण शालेय शिक्षणाकडे पाहतो त्यावेळेस शाळा सोडण्याचे प्रमाण सुमारे 40% एवढ आहे .हे शिक्षण व्यवस्थित समोरचा सर्वात मोठे आव्हान आहे . म्हणूनच आता नवीन शिक्षण धोरणामुळे केजी इथे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिनिमम लेबल ऑफ अंडरस्टँडिंगशी जोडले जाईल .
आपार आयडी आधारपेक्षा वेगळा कसा?
केंद्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये समाविष्ट केले आहेत .आता एक राष्ट्र एक विद्यार्थी एक ओळखपत्र अशा अपार आयडीचा उल्लेख या धोरणात केला गेला आहे .आपल्याकडे आधार असताना अपारची काय गरज आहे ? चा या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले," आपार आयडी विषयी सांगण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, आपल्याकडे पूर्वी एलिट संस्थांना क्रेडिट फ्रेमवर्कने चालायच्या . म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करायचा .त्याची मार्कशीट येणार . या मार्कशीट मध्ये अनेक जण क्रेडिट सिस्टीम लागू करायचे . पण या व्यवस्थेला मॉनिटर कसे करणार ?यासाठी विद्यार्थ्याचं शिक्षण त्याला दिलेल्या पात्रता, त्याला मिळालेले गुण गुण हे सगळं अपार आयडी मध्ये एकाच वेळेस डिजिटली नोंदवता येणं शक्य होणार आहे . आपण आयडी मधून या व्यवस्थेला डीजी लॉकर मध्ये ठेवण्यात आला आहे .यामुळे होणार काय तर जो विद्यार्थी मुलाखत द्यायला एखाद्या कंपनीत जाईल तेव्हा त्याला त्याच्या गुणपत्रिका आणि शिक्षणाच्या तपशिलांची फाईल घेऊन जाण्याची गरज नाही . मुलाखतकार विद्यार्थी त्याच्यासमोर पोहोचण्याआधीच डीजी लॉकर आणि पासवर्डच्या माध्यमातून त्याच्या संपूर्ण तपशिलाचे पडताळणी करून त्याची मुलाखत घेऊ शकेल . आपार आयडी हा आधारचाच बाय प्रोडक्ट आहे . सरकारी सुविधा देताना त्यांच्या त्यांच्या विभागात त्याचं डॉक्युमेंट करण्यासाठी हे बाय प्रॉडक्ट बनवले गेले आहेत . आपर आयडी हा मँडेटरी नसून विद्यार्थी या व्यवस्थेमध्ये दाखल केला जातो . असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























