एक्स्प्लोर

CBSE Fake Notice : CBSE च्या परीक्षांबाबत 'ती' नोटीस फेक, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा

CBSE Fake Notice : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) टर्म टू परीक्षांबाबत खोट्या नोटीस प्रसारित होत असल्याबद्दल इशारा दिला आहे. नेमके प्रकरण काय ते जाणून घ्या

CBSE Warns About Term 2 Exam Fake Notice : आजकाल सोशल मीडियावर CBSE टर्म 2 परीक्षा 2022 शी संबंधित सूचना देणारी (CBSE fake notice)  एक नोटीस फिरत आहे. याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाने (CBSE) इशारा देत आवाहन केले आहे की, ही नोटीस बनावट आहे आणि त्यात दिलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. 

नोटीसमध्ये काय लिहिलंय?

सीबीएसईच्या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या या बनावट नोटीसमध्ये 27 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे आणि परीक्षेच्या शेवटी काय करावे अशा अनेक सूचना यात देण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “परीक्षा सुरू झाल्यानंतर न वापरलेल्या प्रश्नपत्रिका लगेच पॅक कराव्यात. तसेच सकाळी 11.30 नंतर परीक्षा केंद्रात कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. 

 

सीबीएसईकडून स्पष्ट

सीबीएसईने या बनावट नोटीसचे छायाचित्र ट्विटरच्या माध्यमातून 'फेक न्यूज अलर्ट'सह शेअर केले आणि बोर्डाने अशी कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचे स्पष्ट केले. या नोटीसमध्ये परीक्षेच्या वेळी पाळण्यात येणारे नियम तर सांगितले आहेतच, शिवाय उत्तरपत्रिका कशा पॅक करायच्या? याचीही माहिती देण्यात आली आहे. CBSE ने अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. CBSE ने टर्म दोन परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे किंवा परीक्षेच्या शेवटी काय करावे यासारख्या कोणत्याही सूचना जारी केल्या नाहीत (CBSE term 2 fake notice alert) असं सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

26 एप्रिलपासून परीक्षा सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या टर्म 2 च्या परीक्षा उद्यापासून 26 एप्रिलपासून सुरू झाल्या आहे. सीबीएसई बोर्डाने या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत असणार आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षा 2022 पूर्वी वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु, यावेळी देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget