एक्स्प्लोर

CBSE Exams 2023 : आजपासून CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात; 'या' मार्गदर्शक सूचना पाळा

CBSE Board Exams 2023 From Today : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच, सीबीएसईची (CBSE) दहावी आणि बारावीची परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

CBSE Board Exams 2023 Start From Today : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) दहावी आणि बारावीच्या परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. CBSE बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येईल. परीक्षेसाठी अवघे काही तास शिल्लक असून विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच परीक्षेआधी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे, यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही.

CBSE बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना

  • सकाळी 10 वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे परीक्षेला वेळेवर जा. वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचा.
  • परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करावा आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावं. तसेच विद्यार्थ्याकडे सीबीएसईचं प्रवेशपत्र (Hall Ticket) असावं.
  • केंद्राकडून परवानगी असलेलं स्टेशनरी साहित्य (Stationery) परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत नेऊ नका.
  • कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.
  • प्रवेशपत्रावर दिलेलं नियम नीट वाचा आणि त्यांचं पालन करणं सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असणार आहे.
  • परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग निवडू नका आणि सर्व नियमांचं योग्यरित्या पालन करा.
  • परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांचा भाग बनू नका.

CBSE Board Exam 2023 : आजपासून सीबीएसई बोर्डाची परीक्षा

दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत.

CBSE Board Exam 2023 : सीबीएसई परीक्षा यंदा एकाच टर्ममध्ये

कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावीमध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई (CBSE) बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. 

देशभरातील 7200 केंद्रांवर परीक्षा

यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 38 लाख विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा आजपासून सुरू होत असून 15 एप्रिल 2023 पर्यंत घेण्यात येईल. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला एकूण 21.8 लाख विद्यार्थी आणि 16.9 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 7200 केंद्रांवर आणि जगभरातील 26 केंद्रांवर सीबीएसई परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील 40 सीबीएसई शाळांकडून एनओसी देण्यास टाळाटाळ!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
Sunita Williams : अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar Group:विधान परिषद 1 जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 88अर्ज, 1 नाव अंतिम करणार :सूत्रSatish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणारNitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
Sunita Williams : अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Embed widget