(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वरळीत हिट अँड रन : त्याने ब्रेक मारला असता, तर माझी पत्नी वाचली असती, आरोपीवर कारवाई करण्याची पतीची मागणी
Mumbai Crime News : मिहीरने दुचाकीवर असलेल्या पती-पत्नीला ठोकलं. गाड्यांची टक्कर झाल्यानंतरही मिहीरने ब्रेक न दाबता चारचाकीने दाम्पत्याला फरफटत नेलं.
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा यांना मिहीर शहा याने उडवलं. यातील प्रदीप नाखवा यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मासेमारी बंद असल्याने क्रॉफर्ड मार्केटमधून मासे घेऊन विभागात विकायला घेऊन येत असताना मागून गाडी ठोकली आणि कावेरीला त्याने फरफटत नेले, आपण थांबण्यास सांगत असताना ही मिहीर थांबला नसल्याचे प्रदीप यांनी सांगितले. गाडी एक तरुण चालवत असल्याचे ही त्यांनी सांगितले. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी प्रदिप नाखवा यांनी केली आहे.
आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून कारची पाहणी
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी वरळी हिट एंड रन प्रकरणातील कारची पाहणी केली आहे. या प्रकरणामध्ये आरटीओचा रिपोर्टही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरटीओचे वरिष्ठ वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी या कारची पूर्णपणे पाहणी केली असून त्यावर या आधी कोणते दंड आहेत? इन्शुरन्स आणि इतर तांत्रिक माहिती ही तपासली जात आहे.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचं उघड
मिळालेल्या माहितीनुसार वरळी हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षाचा आहे. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसोबत दारु पिण्यासाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. घरी जाऊन त्याने आपल्या ड्राइवरला लाँग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. यावेळी तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी त्याने एक दाम्पत्याला ठोकलं. गोरेगावला जात असताना अट्रिक मॉलजवळ अपघात झाला.
पाहा व्हिडीओ : 'हिट ॲण्ड रन' प्रकरणातील आरोपी पार्टी करायला बारमध्ये गेल्याचं उघड
त्याने ब्रेक मारला असता, तर माझी पत्नी वाचली असती
मिहीरने दुचाकीवर असलेल्या पती-पत्नीला ठोकलं. गाड्यांची टक्कर झाल्यानंतरही मिहीरने ब्रेक न दाबता चारचाकीने दाम्पत्याला फरफटत नेलं. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती जखमी झाले आहेत. अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर शहा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
View this post on Instagram