एक्स्प्लोर

Worli Hit and Run Case : 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास; पोलिसांना कसा सापडला आरोपी मिहीर शाह?

Worli Hit and Run Case Mihir Shah Arrested : वरळीतील अपघातानंतर आरोपी मिहीर शाह तीन दिवस फरार होता. मात्र, मिहीरचा 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास झाला. मिहीर पोलिसांना कसा सापडला? हे जाणून घ्या.

मुंबई : वरळी हिट अँड रन (Worli Hit and Run Case) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 60 तासांनंतर पोलिसांना मिहीर शाहाला अटक करण्यात यश आलं आहे. मिहीर शाह हा पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल केसकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अपघातानंतर मिहीर शाह तीन दिवस फरार होता. मात्र, मिहीरचा 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास झाला. आरोपी मिहीर शाह पोलिसांना कसा सापडला, हे जाणून घ्या.

BMW च्या धडकेत महिलेचा मृत्यू

मिहीर शाहाने बीएमडब्ल्यूने वरळीत दुचाकीवरील पती-पत्नीला टक्कर मारली. BMW ने टक्कर मारल्यानंतर त्याने महिलेला तसंच काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आणि पती जखमी झाला. यानंतर मिहीर शाहने पळ काढला. अपघातावेळी मिहीर शाहाचं गाडी चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या अपघातानंतर मिहीर शाहला पळण्यासाठी त्यांच्या वडिलांनीच मदत केल्याचं सांगितलं जात आहे.

फरार आरोपी मिहीर शाहला अखेर अटक

आरोपी मिहीर शाह हा त्याचे मित्र आणि कुटुंबियांसोबत शहापूरला रिसोर्टमध्ये होते. मित्र आणि त्याने स्वत: मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मिहीर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या दुसऱ्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री दोन मित्रांसह मिहीर हा कुटुंबियांना न कळवता. विरारला आला. दरम्यान, आज सकाळी 15 मिनिटांसाठी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला.

60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास

दरम्यान, मंगळवारी सकाळी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला होता. अवघ्या 15 मिनिटांत पुन्हा फोन बंद करण्यात आला. पण, हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं.

नेमकं काय घडलं?

मिहिरचा फोन फक्त काही मिनिटांसाठी सुरु झाला होता, पण तेवढ्यात त्याच्या फोनचं लोकेशन पोलिसांना सापडलं. मिहीरच्या मोबाईलचं लोकेशन विरारला ट्रेस झालं. पोलिसांचा संशय बळावल्याने वरळी पोलिसांचे बोरिवली येथे असलेले पथक विरारच्या लोकेशनवर पोहोचलं. पोलिसांचे पथक विरारला घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मिहीरला ताब्यात घेतलं, तर उर्वरित 12 जणांना  शहापूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget