एक्स्प्लोर

Whale's vomit : 6 कोटी 20 लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, पोलिसांकडून तिघांना बेड्या, आरोपी उलटीचं करतात तरी काय?

Whale vomit : व्हेल माशाची तब्बल 6 कोटी 20 लाख रुपयांची उलटी पोलिसांनी कल्याणमध्ये जप्त केली आहे.

Whale vomit, Kalyan : व्हेल माशाची उलटी (Whale vomit) विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण (Kalyan) क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात. अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील अशी तिघा आरोपींची नावे आहेत. तिघे पनवेल परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याजवळून सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी उलटी कुठून आणली ,कुणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे. 

बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती अन् पोलिसांनी सापळा रचला 

अधिकची माहिती अशी की, व्हेल माशाची उलटीची अनधिकृतरित्या विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवर सापळा रचला. संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळली. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्काळ गाडी मधील अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील या तिघांना ताब्यात घेत अटक केली. सुमारे सहा कोटी 20 लाखांची उलटी व कार जप्त केली. या तिघांनी उलटी कुठून आणली कुणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँचचे पथक करत आहे.

आरोपी उलटीचं काय करतात?

व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढले आहेत.

यापूर्वी चिपळूणमध्येही व्हेल माश्याचा उलटीच्या तस्करीचा अशाच प्रकार समोर आला होता. याप्रकरणात एक बीएचएमस डॉक्टरला अटक करण्यात आली होता. या प्रकरणात  10 किलो उलटी पोलिसांनी जप्त केली होती. तर चार आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले  होते. आरोपींना कोर्टात हजर करून पोलिसांनी कस्टडीची मागणी केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akshay Shinde : एन्काऊंटर होऊन 5 दिवस उलटले तरिही अक्षय शिंदेचा अंत्यविधी नाहीच, अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर

Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Satara Crime News: म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget