एक्स्प्लोर

Washim Crime News : हुंड्यासाठी पतीकडून नवविवाहितेची निर्घृण हत्या; वाशिम जिल्ह्यातील घटना

Washim Crime News : वाशिमच्या वाघजाळी गावात नवविवाहितेची हुंड्यासाठी तिच्याच पतीने गळा चिरून हत्या केलाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Washim Crime News वाशिम : समाजात हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शासन दरबारी या संबंधित कठोर कायदा असून देखील आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना वाशिमच्या (Washim) वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी (Dowery) तिच्याच पतीने गळा चिरून हत्या(Crime) केलाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

चारचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा

काही महिन्याअगोदर चिखली बु. गावातील मेघा शिंदे (Megha Shinde) या तरुणीचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे (Gajanan Shinde) या तरुणाशी झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला. तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यानंतर मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला. मेघा ही आपल्या पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथ पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघाची गळा चिरत हत्या केल्याची माहिती मिळत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पती गजानन शिंदे याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अधिक पैशांच्या मागणीसाठी सासरकडून छळ

पती गजानन शिंदे, सासरे बबन श्यामराव शिंदे, सासू पार्वती बबन शिंदे (रा. वाघजाळी) यांनी लग्नानंतर चारचाकी वाहन घेण्यासाठी मेघाच्या वडिलांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. मेघाच्या माहेरच्यांनी काही पैसे धनादेशाद्वारे दिले. मात्र, आणखी रक्कम हवी म्हणून अधिक छळ सासरच्यांनी केला. शनिवारी 27 जानेवारीला मेघा ही पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथे पुन्हा यांच्यात पैशांवरून वाद झाला. सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघावर चाकूने वार केला. त्यानंतर जखमी अवस्थेत मेघाला वाशिमच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने मेघाची प्राणजोत मावळली.

मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

या प्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी वाशीम ग्रामीण पोलिसात (Washim Police) तक्रार दिली असून या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगोले करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 17 June 2024Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Embed widget