एक्स्प्लोर

Washim News : शिरपूरच्या जैन मंदिरातील वाद प्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; देवाच्या दारातच दोन पंथियांमध्ये झाली होती तुंबळ हाणामारी

जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील मंदिरातील मूर्ती पूजनावरून झालेल्या वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या जवळपास 16 लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

Shirpur Jain Mandir वाशिमजैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिम (Washim) जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा मूर्तीपूजनावरून वाद झाला होता. दिगंबर जैन आणि श्वेतांबरी जैन यांच्या भक्तांमध्ये आणि महाराजांमध्ये मूर्ती पूजनावरून काही वेळ शाब्दिक वाद निर्माण झाला आणि कालांतराने या शाब्दिक वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं होतं. त्यानंतर आता या प्रकरणी दिगंबर जैन आणि श्वेतांबरी जैन पंथीयांच्या तक्रारीनंतर दोन्ही गटाच्या जवळपास 16 लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम पोलीस (Washim Police ) करत आहेत.   

16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जैन मंदिरातील मुख्य भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती पूजनची वेळ ठरवून दिली असतांना इतर वेळी मूर्तीपूजन करत असताना दिगंबरी जैन महतांना आणि भक्तांना विरोध केल्याने हा वाद झाल्याचं पुढे आले होते. गेल्या एक तारखेला ही अशीच एक किरकोळ हाणामारी पर्यंतची घटना घडली होती. मात्र, त्यावेळी या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने पुढे कुठलीही कारवाई झाली नाही. मात्र, दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा नवीन वादाने डोकं वर काढल्याचे बघायला मिळाले. या वादात दोन पंथियांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

यामध्ये महेश जैन दिगंबर पुजारी आणि प्रियंक प्रकाशभाई सेठ, स्वेतांबर पंथ स्वयंसेवक हे दोघे जखमी झाले आहेत. यातील महेश जैन हे गंभीर स्वरूपाचे जखमी झाल्याने त्यांना वाशीम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर प्रियंक प्रकाशभाई सेठ याच्या फिर्यादीवरून महेश जैन पुजारी, हर्षल संजय विश्वंभर, तात्या भैया आणि रवी पद्मकुमार महाजन तसेच इतर सात ते आठ व्यक्तिविरुद्ध भांदवी कलम 143, 114, 323, 504, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या घटनेचा अधिक तपास शिरपूर पोलीस करत आहे.

नेमका वाद काय? 

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती हक्का वरुन दोन पंथात हा वाद आहे. गेल्या दीडशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती श्वेतांबर जैन पंथीयांची की दिगंबर जैन पंथीयांची यावरून हा वाद सुरू होता. मात्र, गेल्या वर्षीच्या 22 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देत भक्तांसाठी हे मंदिर उघड करण्याचे आदेश दिले होते आणि दोन्ही पंथाना ठराविक वेळ ठरवून दिली होती. ठरवून देलेल्या वेळी मूर्ती पूजनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी या मूर्तीची जी झीज झाली होती ती मूर्ती चांगल्या स्थितीत असावी, यासाठी मूर्तीला लेपणाचे कार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

मात्र, दरम्यानच्या काळात मूर्तीचे स्वरूप बदलून दिगंबरी मूर्ती ही श्वेतांबरी केल्या जात असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतरही अनेकवेळा या मंदिरावरुन दोन्ही पंथांमध्ये वाद निर्माण झाला होता आणि अखेर हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र अनेक दशकापासूनचा हा वाद आजही त्याच प्रमाणात सुरू आहे. त्याचाच परिणाम आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि दोन्ही पंथीयांकडून एकमेकाला हाणामारीचा प्रकार घडल्याचे आज पुन्हा बघायला मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget