Wardha Crime : सख्ख्या भावाकडूनच लहान बहिणीवर अत्याचार, पीडिता 6 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर घटना उघड
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटनासख्ख्या भावाकडूनच लहान बहिणीवर अत्याचार पीडिता 6 महिन्यांची गर्भवती राहिल्यावर घटना आली उघडकीसपीडिता आणि आरोपी भाऊ दोघेही अल्पवयीनवर्धा शहर पोलिसांकडून पूढील तपास सुरु
Wardha Crime : वर्धा (Wardha) शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहीण-भावाच्या नात्याला (Brother-Sister Relation) काळीमा फासणारी घटना घडली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेत पीडिता गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपीही अल्पवयीन (Minor) आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर समजलं जातं आहे. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना भावाने आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून आरोपीचा कसून तपास सुरु आहे.
प्रकृती बिघडल्याने नेलं सेवाग्राम रुग्णालयात
पीडित मुलीची प्रकृती बिघडली आणि तिचं पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तिचे पालक तिला घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं कारण ऐकून पालकांना धक्काच बसला. पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात बहिण-भाऊ, बाप-लेक या नात्यांना काळीमा फासणाऱ्या विचित्र घटना घडल्या आहेत. त्यात वर्ध्यातील या घटनेने भर टाकली आहे.
घरच्यांनी दिली पोलिसांत तक्रार
मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर घरच्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील पॉक्सो सेलने या घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने सुरुवातील काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. त्यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपवण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पाणावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेची साक्ष नोंदवल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.