एक्स्प्लोर

Wardha Crime News : हृदयद्रावक! जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून मुलाने केली हत्या

Wardha Crime News: वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील काचनूर गावात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये पोटच्या पोराने आपल्या जन्मदात्या आईच्या हत्या केली आहे.

Wardha Crime News वर्धा : आर्वी (Wardha News) तालुक्यातील काचनूर गावात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये पोटच्या पोराने आपल्या जन्मदात्या आईच्या हत्या केली आहे.  गावातील एका महिलेशी असलेल्या मुलाच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून मुलाने हत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी खरंगणा पोलिसांनी(Police) हत्येचा गुन्हा दाखल करीत मुलाला ताब्यात घेतले आहे. मृतक महिलेचे नाव मीरा मुरलीधर पुसदकर असे आहे. तर 32 वर्षीय सोपान मुरलीधर पुसदकर असे अटक करण्यात आलेल्या मारेकरी मुलाचे नाव आहे.  

रागाच्या भारत आईच्या डोक्यात घातला वरवंटा 

आईची हत्या करणाऱ्या सोपान पुसदकरचे त्याच्या परिचयाच्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. दरम्यान हे दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात होते. प्रेमात  बुडालेल्या सोपानने ही गोष्ट आईपासून लपवून ठेवली होती. मात्र कालांतराने गावातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण आईला लागली. आईने याबत सोपानला विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करत वेळ मारून नेली. मात्र याबाबत खात्री केल्यानंतर आईने याबाबत कडाडून विरोध केला असता, त्यांच्यात वाद उफाळून आला.

हा वाद एवढा तीव्र होता की रागाच्या भरात सोपानने आपल्या आईला मारहाण केली. ज्यामध्ये मुलाने घरातील वरवंटा थेट आईचा डोक्यावर मारला. त्यामुळे आई रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेमुळे सोपान भानावर आला आणि त्याला आपल्या कृत्याची जाणीव झाली.  रागाच्या भरात त्याच्या हातून फार मोठा गुन्हा झाला असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खरंगणा पोलीस करत आहेत. 

दुप्पट पैसे देण्याच्या आमिषापोटी दिल्या मनोरंजन बँकेच्या नोटा 

ऑनलाईन फसवणूकीसाठी सायबर गुन्हेगारांची टोळी नवनव्या युक्त्या शोधून काढत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समुद्रपूर तालुक्यात उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे सांगत दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष पंकज राजाराम टिकले (रा. पवनी, जि. भंडार) यांना दिले. त्यावरून पंकज यांनी 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली. मात्र, त्याला मोबदल्यात मनोरंजन बँकेच्या नोटा देण्यात आल्या. ही बाब उघड झाल्यानंतर गुंतवणूक करणाऱ्या पंकज यांना जबर धक्का बसला. त्यानी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत या प्रकरणी दोन व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 1 लाखांच्या रोख रकमेसह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

सध्या शेअर बाजार तेजीत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक लोक कुठलाही अभ्यास किंवा योग्य मार्गदर्शन न घेता सर्रास अशा फसव्या जाळ्यात फसत असतात. हीच संधी साधून अनेक सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडा घालत असतात. यामध्ये फसव्या गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्यांमध्ये आता शहरासह ग्रामीण भागातील व्यक्तीचा देखील मोठा प्रमाणात सहभाग आहे. गुंतवणुकीचे सल्ले देण्यासाठी अनेक फसवे फोन कॉल ग्राहकांना गळाला लावण्यासाठी केले जात आहेत. तर अनेक बोगस एजंटही जिल्ह्यात सक्रिय आहेत. अशात फोन वरून संपर्क साधत एका बोगस एजंटने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला पंकज यांना दिला. पंकज यांना विश्वासात घेतले आणि रोख रक्कम गुंतविल्यास दामदुप्पट देण्यात येईल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यावर त्यांनी विश्वास दर्शवत पैसे गुंतवले मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे उशिरा लक्षात आले. त्यांनी पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी दोन व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Embed widget