एक्स्प्लोर

स्नॅप चॉटवर म्हणाली, 'आय क्विट'; MBBS च्या विद्यार्थीनीची कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी, नेमकं घडलं काय?

Wardha Crime : वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीनं कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना.

Wardha Crime : वर्धा : वर्ध्यातील (Wardha) एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या (MBBS) दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीनं कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना वर्ध्यातील सावंगी येथे घडली. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. एबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पूजानं सकाळी स्नॅप चॅटवर 'आय क्विट' असं म्हटलं होतं. महाविद्यालयात परिक्षेपासून वंचीत ठेवलं जात असल्यानं तिनं आत्महत्या केली असल्याचा आरोप आई वडिलांनी केला आहे.

वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीनं कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली आणि आत्महत्या केल्याची घटना सावंगी येथे घडली. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. पूजानं सकाळी स्नॅप चॅटवर 'आय क्विट' असं चॅट करून आत्महत्येचा इशारा दिला असल्याची माहिती पुढे येते आहे. महाविद्यालयात परिक्षेपासून वंचीत ठेवलं जात असल्यानं तिनं आत्महत्या केली असल्याचा आरोप आई वडिलांनी केला आहे.

नेमकं काय घडलं? 

नागपूर येथील रहिवासी असलेली पूजा राजनी ही सावंगी मेघे येथे एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करत होती. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार होत्या. ती हॉल तिकीट मिळवण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात गेली होती. शुक्रवारी पॅथॉलॉजी वन हा पेपर होता. पण महाविद्यालयात 75 टक्के हजेरी नसल्यानं तिला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आलं. तिच्यासोबतच इतर 45 विद्यार्थी होते, ज्यांची 75 टक्के हजेरी नव्हती. 45 विद्यार्थ्यांनाही परीक्षेसाठी प्रतिबंध करण्यात आला होता. 

सकाळी पूजानं नेहमीप्रमाणे पहिलं लेक्चर अटेंड केलं. त्यानंतर ती लायब्ररीमध्ये गेली. काही वेळानंतर लायब्ररीच्यावर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन तिनं तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली उडी घेतली. या धक्कादायक घटनेनं कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वी पूजानं आपल्या आई आणि वडिलांना फोन केला होता. फोन करून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची माहिती तिनं फोनवरून त्यांना दिली असल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे.

घटनेनंतर महाविद्यालयाकडून तात्काळ पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सकाळी मोबाईलवर स्नॅपचाटवर 'आय क्विट' असा मेसेज करून पूजानं इशारा दिला असल्याची बाब समोर आली आहे. अभ्यासात हुशार आणि सातत्यानं मित्र मैत्रिणींशी गप्पा करणारी पूजा आत्महत्या करू शकते, अशी कल्पनाही करू शकत नसल्याची खंत तिच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. पुजाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav Ratnagiri : थेट बसमध्ये चढले.. भास्कर जाधावांनी मानले मतदारांचे आभारSambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Embed widget