एक्स्प्लोर

Vasai Crime : 6 वर्षीय चिमुरड्याच्या छातीवरुन कार चालवत फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी उचललं

Vasai Crime : वसईतील (Vasai Crime) वाळीव भागात बुधवारी (दि.26) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले होते.

Vasai Crime : वसईतील (Vasai Crime) वाळीव भागात बुधवारी (दि.26) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले होते. एका सहा वर्षाच्या लहान मुलाच्या छातीवरून टी परमिट वाहन चालवून फरार (Vasai Accident) झालेल्या चालकाला वाळीव पोलिसांनी (Police) अटक केली आहे. कफील अहमद असे या चालकाचे नाव असून, तो गोरेगाव पूर्वेकडील राहणार आहे. अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली होती.

वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा येथे बुधवारी सकाळी 10.21 वाजता ही घटना घडली. एम.एच. 01 ई एम 3245 क्रमांकाच्या कारसाठी ओला ॲपवरून बुकिंग करण्यात आले होते. गाडी प्रवासी घेण्यासाठी येताच पाच वर्षांचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू गाडीच्या समोर मोकळ्या जागेत मातीत खेळत होता. मात्र, कारचालकाने मुलाला पाहण्याचेही भान ठेवले नाही आणि बेदरकारपणे गाडी पुढे नेली. यामध्ये लहानग्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर कार चालकाचे पलायन 

अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कोणतेही ऐकले नाही. ओला बुक करणाऱ्या प्रवाशालाही संपर्क साधण्यात आला, परंतु त्याने कार चालकासोबत येण्याचे सांगत मोबाईल स्विच ऑफ केला.

5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी घातली अन्  फरार झाला

वसई पूर्वेच्या  शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव  येथे आज (दि. 25) सकाळी 10.21  वाजता  मोकळ्या जागेत एम.एच. 01 ई एम 3245 या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. दरम्यान, कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला होता. तेवढ्यात त्या कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. माञ तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला होता.

6 वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर 

अपघातात राघवकुमारच्या हाताला, डोक्याला, आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने वाळीव येथील वालवादेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. दरम्यान, वाळीव पोलिसांनी तत्पर कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनचालक कफील अहमदला अटक केली आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच, चक्क पोलिस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEkvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 जानेवारी 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या बीड पोलीस ठाण्यात संतोष देशमुखांचा भाऊ पोहोचला, बाहेर पडताच म्हणाला...
संतोष देशमुखांचा भाऊ अचानक वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस ठाण्यात कशासाठी गेला होता?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
Embed widget