Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
Crime news: बुलढाण्यात एका पाझर तलावात तीन मृतदेह सापडले आहेत. आई आणि तिच्या दोन मुलांचे हे मृतदेह आहेत. या घटनेमुळे पिंपरी गवळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.
बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका पाझर तलावात आई आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी गावाजवळ असलेल्या तलावात सोमवारी हे तीन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत या तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.
काही गावकऱ्यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती गावात पसरताच अनेक लोक तलावापाशी जमले होते.
प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही मृतदेह बऱ्याचप्रमाणात कुजले आहेत. आईने आपल्या दोन चिमुकल्यांना स्वःतच्या शरीराला बांधलेल्या अवस्थेत पाझर तलावात हे मृतदेह सापडले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पार्वती प्रकाश इंगळे (वय 30), आर्यन प्रकाश इंगळे (वय 8) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. या महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले असल्याचे समोर आले आहे . काही दिवसांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत .
याच तलावात गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. यामुळे पिंपरी गवळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून त्यांच्याकडून सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत. सध्या पोलिसांच्या मते ही आत्महत्याच असल्याचा दिसत असले तरी तरीही वेगवेगळ्या दृष्टीने पोलिस तपास करणार आहेत.
नाशिकच्या कळवण तालुक्यात विहिरीत आढळले दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह
कळवणच्या दुर्गम अश्या लिंगामा गावाजवळील एका विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे व गीतांजली उखंडे असे मयत मुलींचे नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. घटनेचा पुढील तपास कळवण पोलिसांकडून सुरु आहे.
आणखी वाचा