एक्स्प्लोर

Nirmala Gavit Accident News : निर्मला गावितांच्या अपघातप्रकरणी कारचालकाला अखेर अटक; अपघातानंतर काढला होता पळ, 24 तासात बेड्या

Nirmala Gavit Accident Case : नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गावित यांच्या भीषण अपघातकारचालकाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nirmala Gavit Accident Case : नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गावित यांच्या भीषण अपघात (Nirmala Gavit Accident case) कारचालकाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कारचालकला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. काल (मंगळवारी) रात्री उशिरा कारचालक चौहानला अटक करण्यात आली आहे. नातवा सोबत घराजवळ फेरफटका मारत असताना निर्मला गावीत यांना मागून आलेल्या एका कारने धडक दिली होती. अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या असून एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

Nirmala Gavit Accident : नातवासोबत फेरफटका मारत असताना अपघात

नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) या घराजवळ आपल्या नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाला होता. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना धडक देत उडविले होते. या अपघातात माजी आमदार गावित या गंभीर जखमी झाल्या. त्यांनतर त्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कारने अगदी पाठीमागून त्यांना उडवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे अनेक चर्चा देखील रंगू लागल्याचे पहायाला मिळाले. अशातच आता कारचालकाला अटक करण्यात आल्याने या अपघाताचे नेमकं कारण आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

Nirmala Gavit: नेमकं कोण आहेत निर्मला गावित?

निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना इगतपुरी विधानसभा (igatpuri) मतदारसंघातून 2014 साली आमदारकी मिळवली होती. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.

हे हि वाचा

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget