एक्स्प्लोर

"शीना बोरा जिवंत आहे"; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र

Sheena Bora Murder Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Sheena Bora Murder Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीनं हा खुलासा केला आहे. इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला 9 पानी पत्र लिहिले असून यामध्ये शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटले आहे.  शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये आशा कोरके या महिला पोलीस अधिकाऱ्याने पाहिलंय, असा दावा  इंद्राणी मुखर्जीनं आपल्या पत्रात केला आहे. भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला नऊ पानी पत्र लिहिलं आहे. शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंतीही यामध्ये करण्यात आली आहे.  आशा कोरके यांनी दिलेली माहितीनंतर इंद्राणी मुखर्जीने CBI अधिकारी सुबोध जयसवाल यांना पत्र लिहिले आहे.  या पत्रात इंद्राणीने CBI समोर जबाब नोंदवण्यासही तयार असल्याचं सांगितलेय. कोर्टही पोलीस अधिकारी आशा कोरके यांचा जबाब नोंदवू शकते. 

पत्रात काय म्हटलेय इंद्राणी मुखर्जीनं ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह वसुली प्रकरणात CID द्वारा अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आशा कोरके यांनी शीना बोरा हिला काश्मीरमध्ये पाहिलं आहे. काश्मीरमध्ये फिरायला गेल्यानंतर शीना बोराला पाहिलं आहे. इंद्राणी मुखर्जीच्या पत्रानुसार, पोलीस अधिकारी आशा कोरके यांनी काश्मीरमध्ये शीना बोरा हिच्यासोबत संवाद साधला.  जून 2021च्या अखेरीस आणि जुलै 2021च्या सुरुवातीला आशा कोरके काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सुट्टयासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शीना बोरा आणि त्यांची भेट झाली. आशा कोरके यांनी शीना बोरा हिला सर्वांसमोर येऊन जिवंत असल्याचं सांगावं. हत्याच्या आरोपात तुरुंगात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला बाहेर काढावे असे आवाहनही केलं. यावर शीनाने आशा कोरके यांना आपण नवीन आयुष्य सुरु केलं आहे, पुन्हा आधीच्या आयुष्यात माघारी जायच नाही, असे सांगितलं. 

इंद्राणीने पत्रात सांगितले की, आशा कोरके श्रीनगरमध्ये डाल लेक येथे फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी तिथे त्यांनी डाल लेक जवळ एका महिलेला आपल्या मित्रांसोबत फिरायला आलेलं पाहिलं. त्या महिलेला पाहिल्यानंतर कुठेतरी पाहिल्याचा भास झाला झाला, वर्तमानपत्र अथवा टीव्हीवर पाहिल्याचं जाणवलं. त्यानंतर आशा कोरके त्या महिलेच्या जवळ गेल्यानंतर शीना बोरा असल्याचं समजलं. शीना असे नाव घेताच महिलेनं माघारी पाहिलं. त्यानंतर दोघांमध्ये थोडावेल संभाषण झालं. यामध्ये आशा कोरके यांनी शीनाला सर्वांसमोर येण्याचे आवाहन केलं.

काय आहे प्रकरण? - 
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या
Embed widget