एक्स्प्लोर

Sex Racket : नागपुरातील 'या' पॉश भागात सेक्स रॅकेट, पश्चिम बंगाल सह विविध राज्यातील मुलींचा वापर

दुसरीकडे देहव्यापाराचे जाळे शहरातील पॉश एरियापासून तर ग्रामीण भाग असलेल्या मनीषनर, बेसा, बेलतरोडी भागापर्यंत पसरले आहे. या अड्ड्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

नागपूरः शहरातील पॉश रहिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगरात स्पाच्या नावावर सेक्स रॅकेट सक्रिय असल्याची बाब उघडकीस आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या सलुनवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. वर्दळीच्या परिसरात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चांना उधाण आले होते.

बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्मीनगर चौकाकडून माटे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर डिलाईट युनिसेक्स सलून अॅन्ड स्पा आहे. तेथे देहव्यापार सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचना आणि डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्याने सलूनमध्ये गेल्यावर मुलीबाबत सौदा फिक्स केला. त्याने इशारा केल्यावर पोलिसांच्या पथकाने धाड टाकली.

आरोपी बाहेरचे कसे?

यावेळी तीन पीडित मुली तेथे आढळल्या. रंजीत रमेश हलदर (वय 41 रा. हेदेगौडा, पश्चिम बंगाल) व गोरंगा बिस्वास (वय 45, रा. मुंबई) हे दोघेही या सलूनचे मालक आहेत. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून ते देहव्यापारात ओढत व त्यांना सलुनमध्येच देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करुन द्यायचे. हे दोन्ही मालक बाहेरचे असल्याबाबतही विविध चर्चांना उधाण आहे. याचा खरा मालक दुसरा असून हे दोघे फक्त त्याच्यासाठी काम करत असल्याची चर्चा आहे.

विविध राज्यातील मुलींचा वापर

देहव्यापारासाठी पश्चिम बंगालसह विविध राज्यातील मुली येथे आणायचे. पॉश भागात हा प्रकार सुरू असूनदेखील अनेकांना संशय आला नव्हता. पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त चिन्मय पंडीत, सहायक पोलिस आयुक्त माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे आदींनी ही कारवाई केली.

इतर भागातही 'रॅकेट' जोरात

काही वर्षांपूर्वी शहरात गुन्हे शाखेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवरील कारवाईचा सपाटा लावला होता. तसेच अनेक देहव्यापाराचे अड्डे बंद केले होते. मात्र सध्या बोटावर मोजण्याएवढ्याच कारवाईसुरु आहेत. मात्र दुसरीकडे देहव्यापाराचे जाळे शहरातील पॉश एरियापासून तर ग्रामीण भाग असलेल्या मनीषनर, बेसा, बेलतरोडी भागापर्यंत पसरले आहे. त्यामुळे या अड्ड्यांवर पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे.

Gondia Crime : गुन्हा दाखल होऊन चौथा दिवस, पोलिसांना तीसरा आरोपी गवसेना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Embed widget