(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime: दहा घरफोड्या अन् 13 दुचाकी चोरीचा लागला छडा; सराईत गुन्हेगाराकडून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Sangli Crime News: दहा घरफोड्यांसह 13 दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात सांगली पोलिसांना (Sangli Police) यश आलं आहे.
Sangli Crime News: तब्बल 10 घरफोड्यांसह 13 दुचाकी गुन्ह्यांचा (Crime News) छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (Sangli Police) पथकास यश आलं आहे. या चोरट्याकडून तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली पोलिसांनी संशयित चोरट्याकडून दुचाकी, दागिन्यांसह 13 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित हा कोल्हापूर जिल्ह्यातील असून तौफिक सिकंदर जमादार (वय 29, उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ) असं त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती आणि मुद्देमाल सापडला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर महात्मा गांधी पोलीस चौकीत संशयितावर घरफोडीचा, कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही समोर आलं. त्यानुसार तौफिक जमादार यास अटक करण्यात आली आहे.
सांगली शहरासह परिसरात घरफोड्यांसह दुचाकी चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. याचा तपास करण्याबाबत पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अपर अधीक्षक आँचल दलाल यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आलं. सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. अंकली फाटा परिसरात एक संशयित बिना क्रमांकाच्या दुचाकीवर येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं तौफिक जमादार असं नाव सांगितलं. त्याच्याजवळील दुचाकीच्या कागदपत्रांची माहिती मागितली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. पोलिसांचा संशय बळावल्यानं पोलिसी खाक्या दाखवत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती आणि मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी महात्मा गांधी पोलीस चौकीत संशयितावर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं. कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचंही समोर आलं. त्यानुसार तौफिक जमादार यास अटक करण्यात आली. तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं दिली. त्यावेळी झालेल्या चौकशीत कुंभोज, शिरोळ, निमशिरगाव, औरवाड, हरिपूर, विश्रामबाग या परिसरात दुचाकी जप्त करण्यात आला. संशयित तौफिक चोरल्याचं समोर आलं. त्या दुचाकी शामरावनगर येथील साई कॉलनी आणि उमळवाड येथे लावल्याचं संशयितानं सांगितलं. त्यानुसार पथकानं दोन्ही ठिकाणहून साडेसहा लाखांच्या 13 दुचाकी जप्त केल्या.
मिरजेतील साई कॉलनी, शंभर फुटी रस्ता, मिरजेतील विद्यानगर, सांगली बसस्थानक परिसर, शाहू उद्यान परिसर, गारपीर परिसरातील बंद घरांचा कडीकोयंडा उचकटून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याची भांडी असा सात लाख वीस हजारांचा मुद्देमाल सिकंदर जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सांगलीसह संख्येश्वर, विजापूर येथे गुन्हे दाखल आहेत. कारवाईत विनायक सुतार, ऋतुराज होळकर, दीपक गायकवाड, नागेश खरात, हेमंत ओमासे, सुनील लोखंडे, कुबेर खोत, चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, मेघराज रूपनर, निलेश कदम, पाटील यांच्या सहभाग होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :