Kalyan Crime: आधी गोळ्या झाडल्या अन् डोक्यात चाकू खुपसला! रक्ताने माखलेला रंजित जीवाच्या आकांताने इमारतीत शिरला, मदतीसाठी अनेक घराची बेल वाजवली पण...
Kalyan Crime: जखमी रंजीतच्या मदतीसाठी एकही दरवाजा उघडला नाही, अखेर चुलत भावाने डोक्यात आठवेळा वार करून जीव घेतलाच, कल्यामध्ये काय घडलं?

कल्याण: कल्याणधील काटेनमोली परिसरात काल (बुधवारी, 19) रात्री एका व्यक्तीचा गोळी घालून, डोक्यात सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असं खून झालेल्याचं नाव आहे. रंजीत दुबे (Ranjit Dube) याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच ही हत्या केल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. रंजीत दुबे आणि रामसागर (Ram Sager) यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Police) राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या. (Kalyan Crime news) मात्र, जेव्हा भावानेच भावावर वार केले होते, तेव्हा गंभीर जखमी झालेला रंजीत दुबे हा मदतीसाठी आणि जीव वाचवण्यासाठी मदतीची याचना करत होता, मात्र, कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही.
रंजित दुबेला त्याचाच सख्ख्या चुलत भाऊ राम सागर दुबेने भर रस्त्यात गोळ्या घातल्या. दोन गोळ्या राम सागर दुबेने रंजीतवरती झाडल्या, त्यातली एक गोळी लागल्यानंतर भेदरलेला रंजित आपला स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. रस्त्याने पळत होता, बाजूला असलेल्या इमारतीमध्ये रंजित आपला जीव वाचवण्यासाठी गेला, त्याच्या शरीरावरून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत तो पोहोचला. त्या इमारतीमधील घरांचा दरवाजा, बेल वाजवून त्याने मदतीची हाक मारत होता. मात्र, रंजीतला मदतीसाठी कोणीही दरवाजा उघडला नाही. मारेकरी राम सागर आणि त्याचे साथीदार त्याचा पाठलाग करत इमारतीमध्ये शिरले आणि चौथ्या मजल्यावर डोक्यात वार करत त्याचा जीव घेतला. ज्या इमारतीमध्ये रंजित दुबे जीव वाचवण्यासाठी धावला त्या ठिकाणी त्याचे रक्त पडल्याचे दिसून येत होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तर लोक अशा कठीण प्रसंगात मदतीसाठी पुढे येत नसल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.
मृत रंजितच्या वडिलांनी काय सांगितलं?
मृत रंजितच्या वडिलांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, रंजितच्या वडिलांनी अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अर्ज केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच दाखल घेतली नसल्याने आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच्यावरती त्याच्या भावाने गोळ्या झाडल्या, त्यानंतर चाकूने वार केले, तरीदेखील त्याने हिम्मत न हारता जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तो शेजारी असलेल्या इमारतीमध्ये जाऊन मदत मागत होता. दरवाजे वाजवत होता, बेल वाजवत होता. पण कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. समोर गुन्हा घडत असताना कोण मदतीसाठी देत नाही, अशा वेळी तर कोण जाणार असंही मृत रंजितच्या वडिलांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत रंजीत दुबेच्या बहिणीने माहिती देताना सांगितलं की, राम सागरने माझ्या मोठ्या भावाला मारले. त्याने पहिले माझ्या भावावर गोळी (Gun Firing) झाडली. ती गोळी माझ्या भावाच्या बरगड्यांजवळ लागली. त्यामुळे त्याला थोडीशी इजा झाली. त्यानंतर माझा भाऊ स्वत:ला वाचवण्यासाठी पळत होता. तो इमारतीचे चार-पाच मजले चढून वर आला. त्याला धावताना दम लागल्यामुळे तो लिफ्टजवळ खाली पडला. त्यावेळी राम सागरने माझ्या भावाच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे रंजीत दुबेच्या बहिणीने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

