एक्स्प्लोर

भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला अखेर अटक

मुंबईतील घाटकोपरमध्ये सिग्नलवर दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाचा वाद झाला. यानंतर सिग्नल सुटल्यावर रिक्षाचालकाने संबंधित दुचाकीस्वाराला भर रस्त्यातच जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना मागील गाडीतील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबई : मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिग्नलवर दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याने रिक्षाचालकाने सिग्नल सुटल्यावर संबंधित दुचाकीस्वाराला रस्त्यातच जोरदार धडक देऊन पळ काढला होता. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार खाली पडला. ही संपूर्ण घटना एका कारच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 17 डिसेंबरची असल्याचं कळतंय.

घाटकोपरच्या माता रमाबाई नगरमध्ये रहाणारे किशोर कर्डक हे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरून शिवाजी नगरला जात होते. यावेळी रिक्षा चालक सलमान सय्यद हा रिक्षा चालक भरधाव वेगात त्यांच्या बाजूने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षाचे चाक किशोर यांच्या पायावरून गेले. यावेळी किशोर यांनी फ्री वेच्या ब्रिज खाली असलेल्या सिग्नल जवळ त्या रिक्षा चालकाला गाठत त्याला जाब विचारू लागले. यावेळी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. सिग्नल सुटला आणि दोघेही पुढे निघाले तेव्हा रिक्षा चालकाने मुद्दाम किशोर यांना जोरदार धडक दिली आणि पळ काढला.

सुदैवाने या घटनेत किशोर यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्या जीवावर हे बेतले असते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देवनार पोलिसांनी दुचाकीस्वार आणि या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. रिक्षा चालकाला रफिक नगरमधून ताब्यात घेण्यात आले तर किशोर कर्डक यांना देखील संपर्क करून गुन्हा नोंदविण्यास बोलविण्यात आले. या प्रकरणी देवनार पोलिसानी हत्येचा प्रयत्न सारखा गंभीर गुन्हा नोंदविला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालकाची रिक्षा जप्त करून त्याला बेड्या जरी ठोकल्या असल्या तरी अश्या रिक्षा चालकांच्या बाबत प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातमी : अल्पवयीन मुलाच्या हातात वाहनाचे स्टेरिंग देणं भोवलं, वडिलांना घडली तुरुंगवारी

कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास इंद्राणी मुखर्जीचा नकार, विशेष सीबीआय कोर्टात याचिका

मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या

कट मारल्याच्या वादातून रिक्षावाल्याने बाईकस्वाराला उडवलं, मुंबई पोलिसांकडून मुजोर रिक्षाचालक ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget