एक्स्प्लोर

तीन वृद्ध महिलांचा एकाच घरात संशयास्पद मृत्यू, दापोलीतील घटना

या तीन महिलांच्या एकाच घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. 

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील वणौशीतील खोतवाडी येथील एकाच घरातील वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने अवघा दापोली तालुका हादरून गेला असून दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दापोली पालगड रोडवरील वणौशी या गावांमध्ये खोतवाडी आहे. या खोतवाडी मध्ये सुमारे पस्तीस घरे असली तरी बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत. येथील बहुतांश ग्रामस्थ हे कामधंद्याच्या निमित्त मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत. गावांमध्ये केवळ चार ते पाच कुटुंबच वास्तव्याला आहेत. गावातच एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय 75), पार्वती पाटणे (वय 90) या वृद्ध महिला राहत होत्या. तर त्यांच्या समोरच्या घरात त्यांच्याच नातेवाईक असलेल्या इंदुबाई पाटणे (वय 85) या राहायला होत्या. 

सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घराची दारं-खिडक्या बंद करून राहत असत. दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत. त्यांच्या घराच्या समोर त्यांचे कुलदैवताचे मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात. त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसून आल्या नाहीत.  शिवाय त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती. म्हणून ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र आतून काही प्रतिसाद आला नाही.

त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा लोटून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळून आला. त्यांनी तो लोटून पहिला असता त्यांना त्या वृद्ध महिला जळलेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांनी येऊन खातरजमा केली असता घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ही घटना तत्काळ त्यांचे मुंबईतील नातेवाईकांना कळवली. हे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळी मुंबई दापोली येथे येऊन दाखल झाले. त्यानंतर दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे देखील आपल्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी रवाना झाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्थानकात सुरू होते.

या महिला ज्या घरांमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या त्या घराचा पुढील दरवाजा का बंद होता व मागील दरवाजा उघडा होता. त्यातील सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्या जवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त देखील वाहून गेल्याचे दिसून येत होते. शिवाय पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या नातेवाईक होत्या. त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. शिवाय या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता. यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget