एक्स्प्लोर

बार्शीत नुसती 'फटे'चीच चर्चा! कोट्यवधींची फसवणूक अन् मोठी स्वप्न दाखवून आरोपी फरार, गुन्हा दाखल

Solapur Barshi Froud Case : वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणुकीची प्रकरण वाढत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका प्रकरणाची देखील सध्या खूप चर्चा सुरु आहे.

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. त्याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. 

या प्रकरणात  विशाल फटेसह पाच जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र कुणी गुन्हा दाखल करायला समोर येत नव्हते. आज अखेर दिपक अंबारे यांनी विशाल फटेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तो शेअर्स मार्केटमध्ये विशाल फटे पैसे गुंतवायचा. शेअर्स मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवत होता.  विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्सीयल सर्व्हिसेस या कंपन्या त्यानं चालू केल्या होत्या.  या कंपनी मार्फत त्याने शेअर्समध्ये वेगवेगळया कंपन्यांमध्ये बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा वरील कंपन्यांच्या खात्यामध्ये घेतल्या, असं अंबारे यांनी म्हटलं आहे. 

आकर्षक परतावा देण्याचे आमिष, व्यवहाराबाबत मात्र माहिती नाही
पैशांच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता. तो काही लोकांकडून आर.टी.जी.एस. मार्फत किंवा चेकमार्फत किंवा रोख रक्कम घेऊन त्याच्या वरील कंपन्यामार्फतीने व्यवहार करायचा. त्याचा व्यवहार कोणत्या पध्दतीने चालू आहे हे तो कोणास सांगत नसे. फक्त काही वेळेस कोणाला रोख रक्कम दयायची असल्यास माझे एच.डी.एफ.सी. च्या खात्यामध्ये रक्कम जमा करत असे, ती रक्कम मी काढून त्यास ऑफिसला नेवून देत होतो, असं अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय...
शेअर्स मार्केटमध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करुन जास्त नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून मला त्याने त्याच्या कंपनीमध्ये माझी व माझ्या पाहुण्यांची रक्कम गुंतवण्यास विश्वासाने भाग पाडले. विशाल फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स मार्केट मधील आय.पी.ओ. ग्रे मार्केट मध्ये गुंतवणूक करीत आहे असे सांगत असे. आय.पी.ओ. महिन्यातून 2 ते 3 वेळा असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असल्याबाबतची शेअर्स मार्केट मधील अल्गो ट्रेडींग ही नवीन संकल्पना त्याने तयार करुन या ट्रेडींग बद्दल त्याचा भरपूर अभ्यास असल्याचा भासवून त्याने मला माझे नातेवाईकांना तसेच मित्रांना व बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात त्याचे वरील कंपनीमध्ये पैसे गुंतविले होते.  विशाल अंबादास फटे यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे व त्याच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडून मी माझे स्वत:चे, माझ्या स्वत:च्या सख्या भावाचे व माझ्या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले. 

अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा
या प्रकरणी अंबारे यांच्या तक्रारीनंतर विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे , अलका अंबादास फटे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ अंबादे यांनी तक्रार केली असली तरी या प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. बार्शी तालुक्यात फसवणुकीचा आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा देखील काही पोस्टमधून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी बडे नेते, अधिकारी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं लोकांना सांगायचा. त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून लोकांना तशी खात्री करुन द्यायचा, अशी माहिती देखील आहे.

तीन महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष

विशाल फटे हा बार्शीत शेअर ट्रेडिंग कंपनी चालवत होता. सुरुवातीला त्याने कंपनीच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले. आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवुन कोट्यवधी रुपये फटे यांच्याकडे गुंतवणूकिसाठी दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून फटे याचा मोबाईल बंद आहे. बार्शीतल्या घरी कोणीही नाहीये तर बार्शीतल्या उपळाई रोडवर असलेल्या कार्यालयाला देखील कुलूप आहे. त्यामुळे फटे पसार झाल्याच्या चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू होत्या. 

अनेक नेते उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजकांसोबत फोटो दाखवून लोकांना भुरळ

अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, नामवंत व्यक्ती अशा अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या फटेकडे केली होती अशी चर्चा आहे. हा आकडा दोनशे कोटींहून अधिकचा असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र आता या क्षणाला किती आकडा आहे हे संगणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली. मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या या चर्चाबाबत कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. मात्र अखेर काल दीपक बाबासाहेब अंधारे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार 5 कोटी 63लाख 25 हजार रुपयांची फसवणूक या व्यक्तींची झाली आहे. मात्र हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजक यांच्यासोबत काढलेले फोटो दाखवून विशाल फटे लोकांना भुरळ पाडत होता. मोठा परतावा देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक जणांनी कर्ज काढून, जमीन, सोने गहाण ठेवून पैसे गुंतवल्याची माहिती आहे. विशालकडे ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती. अशांनी पुढे येऊन पोलिसांकडे फिर्याद द्यावे असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. 


कोण आहे विशाल फटे?


विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याची माहिती 

सध्या बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता

बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते

मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा

अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक

विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक

फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक

NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा

2019 पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यातील काही जणांना 28 टक्के परतावा दिला

मागील तीन महिन्यात अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली

काही दिवसांपूर्वी 10 लाख गुंतवल्यास वर्षाला 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले

27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली

9 जानेवारीपासून फोन बंद असून, बार्शीतून गायब झाल्याची तक्रार

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Jalgaon : 89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Embed widget