Ratnagiri : उधारीवर कपडे देण्यास नकार दिला, दुकानदाराला गुंडाकडून तलवारीने जीवे मारण्याची धमकी; रत्नागिरीतील घटना
Ratnagiri News : रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये स्थानिक गुंडाची दहशत पाहायला मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri News : उधारीवर कपडे देण्यास नकार दिल्याचा राग मनात घेऊन एका गुंडाने दुकानदाराला तलवारीचा धाक दाखवून धमकावले असल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये स्थानिक गुंडाची दहशत पाहायला मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील सन्मित्र नगर परिसरामध्ये गिरीश लोटणकर यांच्या मालकीचे कपड्याचे दुकान आहे. यावेळी दुपारच्या वेळेला नागेश गजबार याने दुकानात प्रवेश करून कपडे खरेदी केले. जवळपास दोन हजाराच्या घरात कपडे खरेदीचे बिल गेले. आधी कपडे घेऊन जातो बिल नंतर देतो असं नागेश गजबार या लोकल गुंडाचं म्हणणं होतं. पण दुकानदाराने त्याला विरोध केला. त्यानंतर नागेश पुन्हा संध्याकाळी दुकानात हातात तलवार घेऊन आला.
तलवारीचा धाक दाखवून त्याने बघून घेण्याची भाषा केली. दरम्यान दुकान मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या गोष्टीची माहिती मिळताच गुंड सचिन याने दुकान मालकाला फोन करून बघून घेण्याची भाषा केली आहे. याबाबत पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून अशा गुंडगिरीला कायमचा चाप बसवा अशी मागणी सध्या व्यापाऱ्यांकडून होत आहे.
रत्नागिरीत दहावीतील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार
शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमधील (Ratnagiri) कोकरे गावात (Kokare Village) समोर आला होता. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Minor Girl) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात गावातील तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा तपास सावर्डे पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
