एक्स्प्लोर

धक्कादायक... सुपारी समजून आजीने अडकीत्याने फोडला गावठी बॉम्ब

धक्कादायक... सुपारी समजून आजीने अडकीत्याने फोडला गावठी बॉम्ब. भीषण स्फोटात आजी गंभीर जखमी झाल्या आहेत.

Ratnagiri Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावात सुपारी समजून अडकित्त्यानं गावठी बॉम्ब कापल्यानं स्फोट होऊन एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. लक्ष्मी सखाराम देवळी यांनी मुलाच्या मित्राच्या आईसाठी चार सुपाऱ्या दिल्या होत्या. घरी आल्यावर सुधीर यांनी सुपाऱ्या आईच्या हातात दिल्या. हुबेहूब सुपारीसारखी दिसणारी वस्तू लक्ष्मी यांनी अडकित्त्यानं फोडली आणि त्याचा जोरदार स्फोट झाला. अचनाक घडलेल्या घटनेनं संपूर्ण गावात खळबळ उडाली. तसेच, या घटनेमुळं संपूर्ण गावात सुपारी सदृश बॉम्बची भीती पसरली आहे. 

सुपारी सारख्या असणाऱ्या या गावठी बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यांच्या डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा तुटून पडले. तर मधल्या बोटाला जबर दुखापत झाली. रक्ताचे तुषार घरभर पसरले. काही क्षणातच घडलेल्या घटनेनं संपूर्ण कुटुंब पुरतं हादरलं. 

स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता, शेजारील व्यक्तीही त्या आवाजानं दचकले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी जखमी महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संबंधित घटनेची माहिती वृद्धेचा पती सखाराम देवळी यांनी पोलीस ठाण्यात दिली.

सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि उर्वरित मुद्देमाल ताब्यात घेतला. हुबेहूब सुपारीसारखा दिसणारा हा गावठी बॉम्ब कुठून आला? याबाबत आता पोलिस कसून तपास करत आहेत. संबंधित संशयितांचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget