Pune Rave Party Pranjal Khewalkar: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध?; आता पोलिसांचा वेगळाच दावा
Pune Rave Party Pranjal Khewalkar: पोलिसांनी 27 जुलै रोजी पुण्यातील या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणाच्या तपासातील एक नवीन माहिती समोर आली आहे.

Pune Rave Party Pranjal Khewalkar: पुण्यात एका रेव्ह पार्टीत (Pune Rave Party) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह सह पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदर प्रकरणाच्या तपासातील एक नवीन माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी 27 जुलै रोजी पुण्यातील खराडी येथील एका हॉटेलवर रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली, त्यावेळी पार्टीच्या ठिकाणाहून तीन महिला पळून गेल्याचे सांगितले जात होते. पण त्या तीन महिलांचा पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलीस तपासात पुढे आलंय. विशेष म्हणजे, न्यायालयात प्रांजल खेवलकरांची पोलीस कोठडी मागताना पळून गेलेल्या या तीन संशयित महिलांचा शोध घ्यायचा आहे, असं कारण पोलिसांनी पुढे केले होते. मात्र आता पोलीस तपासात या महिलांचा या पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे-
प्रांजल मनिष खेवलकर(41)
निखिल जेठानंद पोपटाणी (35)
समीर फकीर महमंद सय्यद (41)
सचिन सोनाजी भोंबे (42)
श्रीपाद मोहन यादव (27)
ईशा देवज्योत सिंग (23)
प्राची गोपाल शर्मा (22)
ससूनच्या वैद्यकीय अहवालात काय?
सदर प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले आहे. पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलीसांनी अटक केली. त्यांची ससून रूग्णालयात वैदयकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाल पोलीसांनी दिलाय. सातपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.
























