(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पुण्यातील वानवडी येथून चार पीडित तरुणींची सुटका
Pune News : पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्स मध्ये 'गोल्डन टच स्पा' नावाचा मसास सेंटर चालवण्यात येत होते. या स्पा सेंटरवर छापा टाकून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली. पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्स मध्ये 'गोल्डन टच स्पा' नावाचा मसाज सेंटर चालवण्यात येत होता. या स्पा सेंटरवर केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा. कोंढवा) आणि सुमित अनिल होनखंडे (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे, लोचन अनंता गिरमे आणि सार्थक लोचन गिरमे यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्स मध्ये 'गोल्डन टच स्पा' चालवला जात होता. या गोल्डन स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकला. यावेळी संबंधित स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी व्यवस्थापकासह स्पा मालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चार पीडितांची सुटका
गोल्डन स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी छतीसगड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रत्येकी एका महिलेसह एकूण चार पीडित तरुणींची सुटका केली आहे. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक तपास करत असून अटक करण्यात आलेल्या तिघांकडे अधित चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.