एक्स्प्लोर

Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune Crime News : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चालणाऱ्या धक्कादायक गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी प्राण्यांच्या सोनोग्राफी मशीनचा गैरवापर होत असल्याचं समोर आलं आहे.

पुणे : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटप्रकरणी (Illegal Female Foeticide Racket) पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) एक मोठी कारवाई केली आहे. केडगाव चौफुला येथील प्रसिद्ध ‘पार्थ हॉस्पिटल’च्या (Parth Hospital Kedgaon) संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना पोलिसांनी अटक (Doctor Arrested) केली आहे. न्यायालयानं संशयित महिला डॉक्टरला 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गर्भात मुलगी असल्याचे समजताच संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी (Illegal Abortion) या रुग्णालयात पाठवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Female Foeticide Shocking Revelation : प्राण्यांच्या सोनोग्राफी मशीनचा महिलांसाठी वापर

यवत (Yavat Police) परिसरात उघडकीस आलेल्या या रॅकेटच्या तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि तोतया डॉक्टर अण्णासाहेब गिरी हा गावोगावी फिरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या (Portable Sonography Machine) साहाय्याने महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत होता.

तपासात निष्पन्न झाले आहे की, गाई-म्हशींसारख्या पशुधनाच्या (Veterinary) आरोग्याची तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा गैरवापर हा महिलांचे गर्भलिंग निदान करण्यासाठी केला जात होता. या तोतया डॉक्टरच्या तपासणीत गर्भात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, वो पुढील बेकायदेशीर गर्भपातासाठी महिलांना केडगाव चौफुला येथील डॉ. संगीता गायकवाड यांच्या 'पार्थ हॉस्पिटल'मध्ये पाठवत असे.

Pune Racket Network Exposed : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात साखळी

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे जाळे अत्यंत मोठे असून ते पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे. हे आरोपी गावोगावी फिरून गरोदर महिला शोधायचे आणि त्यांची बेकायदेशीर तपासणी करायचे.

Arrested Accused List : या प्रकरणात आतापर्यंत झालेली अटक

अण्णासाहेब गिरी (तोतया डॉक्टर आणि मुख्य सूत्रधार)

नरेंद्र साहेबराव ठाकरे (सहकारी)

डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव)

डॉ. संगीता पानांडुरंग गायकवाड (संचालिका, पार्थ हॉस्पिटल - नवीन अटक)

या रॅकेटमधील इतर आर्थिक व्यवहार आणि या साखळीत आणखी किती डॉक्टर्स किंवा रुग्णालये सामील आहेत, याचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget