एक्स्प्लोर

Pune Crime News: दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाचा काटा काढला; आईनेच 11 महिन्यांच्या चिमुरड्याला ओट्यावर आपटून मारलं, पुणे हादरलं!

Pune Crime News: शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Crime News: पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुरड्याचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. मात्र, रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत या क्रूर घटनेचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भांबर्डे येथील रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी आपला 11 महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना सुरुवातीपासूनच मुलाची आई, पूजा रवींद्र पवार हिच्या वागण्यावर संशय येत होता.

Pune Crime News: पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल

पोलिसांनी जेव्हा पूजा पवारची कसून चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. "मला दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही," या विकृत विचारातून तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याचे कबूल केले.

Pune Crime News: पुरावा नष्ट करण्याचा थरारक प्रयत्न

आरोपी महिलेने मुलाला सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह एका कापडाच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने त्यात जड दगडही भरले आणि ती बॅग गावातील एका विहिरीत फेकून दिली. पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

Pune Crime News: आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात

रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिला पूजा पवार हिला अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मातेने दुसऱ्या लग्नासाठी आपल्या चिमुरड्याचा असा निर्घृण बळी घेतल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ऋषिकेश वैद्यची शेंडीबाबत अजब मागणी मान्य; पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला दिले आदेश,नेमकं प्रकरण काय?

Thane Crime News: ठाण्यात संतापजनक घटना, अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीसोबत कन्स्ट्रक्शन साईटवर नको ते कृत्य, नराधमाला बेड्या

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget