Pune Crime News: किरकोळ वाद विकोपाला, पुण्यात हॉटेलच्या वेटर आणि मालकाकडून दोन तरुणांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
Pune Crime : पुण्यात हॉटेलच्या वेटर आणि मालकाकडून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जेवण करण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना हॉटेलचे वेटर आणि हॉटेल मालकांनी किरकोळ कारणावरून मारहाण केलीय.

Pune Crime News: पुण्यात हॉटेलच्या वेटर आणि मालकाकडून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जेवण करण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना हॉटेलचे वेटर आणि हॉटेल मालकांनी किरकोळ कारणावरून मारहाण केलीय. पुण्याजवळील मांजरी येथील हॉटेल हॅप्पी पंजाब येथे हि धक्कादायक घटना घडलीय. आशिष भगत आणि त्याच्या मित्राला हॅप्पी पंजाबच्या वेटर आणि मालकाने हि बेदम मारहाण केली असून मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणी प्रकरणी चार जाणांविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: किरकोळवादाचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये, घटना सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, भगत आणि त्याचा मित्र दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बेलेकर वस्ती या परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर गेट उघडायला सांगितल्यानंतर वेटरने त्यास वाद घालण्यास सुरुवात केली आणि या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झालं. या हाणामारीत भगत आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले असून सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Pune Crime : पुणे विमानतळावर तब्बल 2.29 करोड रुपयांचा गांजा जप्त
पुणे विमानतळावर 2.29 करोड रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रवाशाच्या बॅगमध्ये 2 किलो गांजा मिळून आला आहे. बँकॉक वरून परतणाऱ्या प्रवाशाकडे हा अमली पदार्थ मिळून आलाय. पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. एअर इंटेलिजन्स युनिटकडून एका प्रवाशाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Pune Crime : विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिटला याबाबत गोपनीय माहिती मिळाली असल्याने त्यांनी 8 डिसेंबर रोजी बँकॉकवरून पुण्यात आलेल्या इंडिगो विमान क्रमांक 6E-1096 मधील एका प्रवाशाला चौकशीसाठी थांबवले. त्याच्या चेक इन बॅगची तपासणी केली असता त्यात दोन एअरटाईट पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. त्याच्या बॅगेतून 2 हजार 299 ग्रॅम गांजा ज्याची बाजार भावाप्रमाणे 2.29 करोड रुपये किंमत आहे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























