Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
Pune : पुण्यात सात वर्षीय चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Pune : सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 78 वर्षीय नराधमास पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील बालाजी नगरमध्ये हा प्रकार घडलाय. मधुकर पीराजी थिटे असं या आरोपीचे नाव असून घराशेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर मधुकर थिटे याने लैंगिक अत्याचार केले. त्या मुलीनेही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला मारण्याची धमकी दिली.
सात वर्षांच्या त्या मुलीला वेदना व्हायला लागल्यावर तीनंही बाब तीच्या आजीला सांगितली. त्यानंतर या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता मधुकर थिटेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच स्पष्ट झालं. आता या मुलीची प्रकृती व्यवस्थित असून मधुकर थिटेला अटक करण्यात आलीय.
पूर्व वैमनस्यातून तरुणाला घेरलं, डोक्यात दगड घालून संपवलं
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात (Nashik Crime News) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी कारंजा (Panchavati Karanja) परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2024) काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल सूर्यवंशी या तरुणाची पंचवटी कारंजा परिसरात काल रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या