एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad : मोटु का म्हणाला? शाळकरी मुलांमध्ये वाद, मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर धारधार शस्त्राने वार

Pimpri Chinchwad Crime : मोटू म्हणून चिडवणाऱ्या मित्राला धडा शिकवायचा असं रागावलेल्या मित्राने ठरवलं. पण मध्ये पडलेल्या मित्रावरच त्याने हल्ला केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांना चिडवण्यावरुन वाद झाला आणि नंतर त्याने गंभीर वळण घेतले. मोटू का म्हणालास असा जाब विचारल्यानंतर हा वाद झाला आणि तो वाद सोडवण्यासाठी आलेल्या मित्रावरच धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. सांगवी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. 

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर विभग्योर शाळेबाहेर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मला मोटु म्हणून का चिडवतो? यावरुन सोमवारी दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. हा वाद नंतर चांगलाच वाढला. त्यानंतर चिडवणाऱ्या मित्राला धडा शिकवायचा, असं रागावलेल्या मित्राने ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी तो भावासह इतर तिघांना घेऊन शाळेबाहेर. तू माझ्या भावाला का चिडवतो, धारदार शस्त्र दाखवून भावासह मित्राने चिडवणाऱ्याला जाब विचारला. हे पाहून शाळेतील एक मित्र मध्यस्थी करायला पुढं आला. अशात चिडवणारा मित्र बाजूला राहिला अन् मध्ये पडलेल्या मित्रावरचं शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये त्या मित्राच्या डोक्यात, मानेवर अन हातावर जखमा झाल्या. डोक्यात टाकेही पडलेत. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दल हादरले आहे. स्वरुप जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सध्या याबाबतचा तपास सुरु आहे.  

पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये  स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याबाबतचा तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत. सध्या ते स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.  

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget