Parbhani Crime : स्त्रीयांचा सर्व क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा, तरिही विकृत पुरुषाचा वंशाच्या दिव्यासाठी हट्ट; तिन्ही मुलीचं झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं
Parbhani Crime : तिन्ही मुलीचं झाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार परभणी जिल्ह्यात घडलाय.
Parbhani Crime : जगभरात आपल्या कार्य कर्तृत्वाने स्त्रीने वेगळा ठसा उमटवला असला तरी आजही वंशाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी एक मुलगा तरी हवा हा पुरुषी अट्टहास कायम असल्याचे समोर आले आहे. यातूनच कुठलाही दोष नसताना 3 मुलीच्या एका मातेला आपला जीव गमवावा लागलाय...पाहुयात मनाला चटका लावणारा एक रिपोर्ट..
अंगाला लागलेली आग कुणी विझवेल म्हणून तशीच विव्हळत ओरडत रस्त्यावर आणि काही दुकानात जात असलेली ही सावित्री आहे. परभणीतील मैना काळे...अंगावर अक्षरशः शहारे आणि तेवढीच चीड आणणारे हे सीसीटीव्ही दृश्य..हिचा दोष एवढाच आहे कि तिला 3 मुली झाल्या..सातत्याने तिचा नराधम पती कुंडलिक हा तिला 3 मुलीचं झाल्याने छळ करायचा आणि त्याच्यातच गुरुवारी रात्री 7 वाजता पुन्हा कुंडलिकने भांडण केले आणि त्यातच मैना यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले महत्वाचे म्हणजे त्याच्या मुलींनाही त्याने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलींना मैना यांनी वाचवले अन् तशीच अंगावर आग घेऊन त्या बाहेर पडल्या लोकांनी आग विझवली. मात्र मैना वाचू शकल्या नाहीत..
परभणी शहराच्या गंगाखेड नाका परिसरातील उड्डाणपूलाच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये कुंडलिक काळे हा त्याची पत्नी मैना आणि 6 वर्षाची नंदिनी,चार वर्षाची काजल आणि केवळ 1 वर्षाची सोनी अशा 3 मुलीसह राहतात. कुंडलिक हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होता मैनाही त्याला हातभार लावायची मात्र कुंडलिक हा वारंवार तिला 3 मुली झाल्याने त्रास द्यायचा. गुरुवारी 26 डिसेंबर रोजी रात्री सात वाजता कुंडलिकने पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला पोचल्यावर आणलेले पेट्रोल मैनावर टाकले आणि पेटवून दिले मैनाने बाहेर जाऊन स्वतः वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या नागरिकांनी ती आग विझवली व मैनाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात मैनाची बहीण भाग्यश्रीने कोतवाली पोलिसांत कुंडलिक विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केलीय.
एकूणच या घटनेची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. तसेच परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांनीही या कुटुंबाला भेट देऊन परिस्थती जाणून घेत त्यांचे सांत्वन केले आहे. भाजप नेत्या तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही या प्रकारावर भाष्य केलंय.. दरम्यान या धक्कादायक प्रकाराने केवळ परभणीच नाही तर अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय. ज्या महाराष्ट्रात माँ जिजाऊ,सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर,रमाबाई आंबेडकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या ज्याचा आदर्श आजहि जगासमोर आहे त्यांच्याच महाराष्ट्रात केवळ मुली झाल्या म्हणून एका महिलेला जिवंत जाळलं जातंय यापेक्षा दुर्दैव ते काय...
इतर महत्त्वाच्या बातम्या