सख्खे शेजारी, पक्के वैरी!! सासू-सुनेनं तीन वर्षाच्या मुलाचा घेतला बळी, जुन्या भांडणाचा होता राग
Crime News Update: जुन्या भांडणाच्या रागात शेजारी सासू सुनेने ३ वर्षाच्या मुलाचा बळी घेतला.. पोलिसांनी घरातून काढला चिमुकल्याचा मृतदेह
Parabhani Latest Marathi Crime News Update: सख्खे शेजारी, पक्के वैरी! या म्हणीची प्रचिती परभणीमध्ये आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून सासू आणि सुनेनं शेजारच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणीच्या ताडकळस येथील सिद्धेश्वर नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ताडकळस येथे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
परभणीच्या ताडकळस मधील सिद्धेश्वर नगर येथे शेजारी राहणाऱ्या सासू सुनेने जुन्या भांडणाच्या रागातून तीन वर्षीय चिमुकल्याचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह घरातच पुरुन ठेवला होता. या धक्कादायक घटनेचा छडा लावण्यात परभणी पोलिसांनी यश आलं आहे.
परभणीच्या ताडकळस मधील सिद्धेश्वर नगर येथील गणेश धोत्रे यांच्या पत्नी 13 जानेवारी रोजी शेतातून घरी येत असताना त्यांचा तीन वर्षाचा मुलगा गोविंद गणेश धोत्रे याचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार ताडकळस पोलिसांत दिली होती. त्यानुसार ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली व यात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार धोत्रे यांचे शेजारी कावेरी गजानन बनगर यांनी गोविंद अंगणात खेळत असताना त्याला उचलून घरात घेऊन जात खून केल्याचा संशय आला. त्यानंतर तपासासाठी पोलिसांनी संशयित कावेरीस ठाण्यात बोलावून विचारपूस केली असता तिने आमच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला उचलून नेट कावेरी आणि तिची सासू अन्नपूर्णा बाळासाहेब बनगर हिच्या मदतीने खून केला. घरातच त्याला एका कोपऱ्यात फर्शीखाली पुरल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या घरातून तहसीलदार यांच्या समक्ष तीन वर्षीय गोविंद याचा मृतदेह फर्शीखालून काढून घेत पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणात आरोपी सून कावेरी बनगर आणि सासू अन्नपूर्णा बनगर या दोघींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ताडकळस पोलीसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड हे करत आहेत.
या प्रकरणात गुन्हयाचा तपास ताडकळस पोलीस करीत होते. सदरचा गुन्हा संवेदनशिलता ओळखून पोलीस अधिक्षक रागसुधा आर. यांनी चार पथके नेमले होते.अप्पर पोलीस अधिक्षक यशंवत काळे, व वंसत चव्हाण प्रभारी अधिकारी स्था. गु. शा परभणी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि व्यंकट कुसमे, पोउपनि साईनाथ पुयड पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, राहुल परसोडे, सय्यद मोबीन, जयश्री आव्हाड, दिलावखान पठाण, सिध्देश्वर चाटे, राम पौळ, रफीक, अनिल कोनगुलवार, नामदेव डुबे, पिराजी निळे, सर्व नेमणुक स्था. गु. शा. परभणी यांचे पथक नेमण्यात आले तसेच पो.स्टे. सायबरचे अंमलदार गणेश कौठकर, बालाजी रेड्डी यांच्या मदतीने हा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे