एक्स्प्लोर

लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; एक लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत

Palghar Crime News: पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकानं रंगेहाथ पकडलं आहे.

Palghar Crime News: वीज महावितरण विभागाचे (Mahavitaran) दोन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पालघरच्या (Palghar News) अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) जाळ्यात अडकले आहेत. पालघरमधील लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाच लुचपत विभागाकडून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदारांवर असलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती मिळत आहे. 

पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकानं रंगे हात पकडलं आहे.

एका ग्राहकाविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल झाल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी या दोघांनीही तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचं सांगत ही रक्कम तडजोडीनंतर दीड लाख करण्यात आली आहे. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा आणि पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या पथकानं महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपये रोख रक्कमेची लाच घेताना काल (सोमवारी) संध्याकाळी पाचच्या दरम्यान दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.

वीज महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकानं ही कारवाई केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vasai Crime : वसईत चंदन तस्करांवर मोठी कारवाई, सहा कोटींचा मुद्देमाल जप्त, दोन जणांना घेतले ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget