एक्स्प्लोर

Vasai Crime : वसईत चंदन तस्करांवर मोठी कारवाई, सहा कोटींचा मुद्देमाल जप्त, दोन जणांना घेतले ताब्यात

Vasai Crime: आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची अंदाजे सहा कोटी एवढी किंमत आहे.  मांडवी वन विभागाने रक्त चंदनाची पुष्टी करुन, पंचनामा सुरु केला आहे.  

 Vasai Crime:  पुष्पा चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची (Sandalwood) तस्करी कशी केली जाते? यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. मात्र वसईमध्ये रक्तचंदनाच्या तस्करीची खरीखुरी भांडाफोड झाली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण चौकी येथे रक्तचंदन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड पोलीसांना यश मिळाले आहे.  यामध्ये पोलिसांनी कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनसह दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

 वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण-भिंवडी रोड वरुन एक कंटेनर संशयास्पद माल घेऊन जाणार असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली कामण चौकीतील पोलीस कर्मचा-यांनी पहाटेच्या सुमारास गस्त लावून, एका संशयास्पद कंटेनरला अडवून, चौकशी केली. चौकशी केल्यानंततर त्या कंटेनरमध्ये अंदाजे 30 ते 35 घन मीटर चंदनाचा साठा पोलिसांना आढळून आला. कंटेनरमध्ये पुढे कांद्याच्या गोणी तर मागे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओडंके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची अंदाजे सहा कोटी एवढी किंमत आहे.  मांडवी वन विभागाने रक्त चंदनाची पुष्टी करुन, पंचनामा सुरु केला आहे.  

हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातून आल्याच अंदाजे पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रक्तचंदन मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सध्या वालीव पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी या रक्तचंदना बाबात अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे रक्तचंदनाचे ओंडके कुठे नेले जात होते? यामागचा पुष्पा कोण? याची माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या रक्तचंदनाबद्दल अधिक माहिती देत, याचा वापर औषधासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात, असल्याची माहिती दिली आहे.  रक्तचंदनाच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन जाणाऱ्या या अति दुर्मिळ रक्तचंदन तस्करीचे धागेदोरे कुठंपर्यंत आहेत? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. 

रक्त चंदनाचा उपयोग आणखी कशाकरता होतो? 

रक्तचंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, संयुक्त अमिरात इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. उच्च प्रतिची दारू, मूर्तीकलेचा वापर, तसेच आयुर्वेदामध्ये देखील याचा सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती जाणकार देतात.

संबंधित बातम्या:

कोकणातील जंगलात असलेल्या 'या' झाडाची किंमत आहे तब्बल 100 कोटी!

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget