एक्स्प्लोर

Abp Majha Impact: भारतातील विद्यमान सत्ता उलथवून लावण्याचा संदेश, पाकिस्तानी कवीच्या कवितेचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानी कवीच्या कवितेच्या माध्यमातून भारतातील विद्यमान सत्ता उलथवून लावण्याच्या संदेश देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abp Majha Impact नागपूर : एबीपी माझाच्या बातमीचा जोरदार इम्पॅक्ट नागपुरात पाहायला मिळाला आहे. एबीपी माझाच्या बातमी नंतर पाकिस्तानी (Pakistan) कवीच्या कवितेच्या माध्यमातून भारतातील विद्यमान सत्ता उलथवून लावण्याच्या संदेश देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मे रोजी नागपुरात डावे विचारक 'विरा साथीदार' यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात 'समता कला मंच' च्या वतीने पाकिस्तानी कवी 'फैज अहमद फैज' यांची "हम भी देखेंगे" ही कविता सादर करण्यात आली होती. कवितेच्या सादरीकरणानंतर लगेच मंचावरून "पाकिस्तान मध्ये जिया उल हक या हुकूमशहाची सत्ता ज्या पद्धतीने उलथवून लावण्यात आली, त्याच पद्धतीने भारतातही विद्यमान सत्ता उलथवून लावण्याची गरज असल्याचे" विश्लेषण करण्यात आले होते.

म्हणजेच एका प्रकारे पाकिस्तान मधील हुकूमशाही सत्ता आणि भारतातील विद्यमान सत्ता समसमान असल्याची तुलना करण्यात आली होती. त्यामुळे सध्या भारत सीमेवर पाकिस्तान विरोधात (India Pakistan War) आजवरचा सर्वात मोठा संघर्ष करत असताना देशातील काही डाव्यांना अशा संकटकाळातही देशाला अस्थिर करण्याचे स्वप्न का पडत आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता.  

देशाविरोधात कट रचून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल 

दरम्यान, 14 मेच्या सकाळी एबीपी माझाने त्यासंदर्भात बातमी दाखवताच, देशात नक्षल पिडीतांसाठी काम करणाऱ्या "जनसंघर्ष समिती"ने त्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची  मागणी करत नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा उल्लेख ही करण्यात आला होता. जनसंघर्ष समितीच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत प्राथमिक चौकशी केली. आणि त्या चौकशीअंती या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. देशाविरोधात कट रचून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समता कला मंच विरोधात कठोर कारवाईची मागणी

जनसंघर्ष समितीने या प्रकरणी आयोजक तसेच नाहक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समता कला मंच विरोधात कठोर कारवाईची मागणी जन संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि या प्रकरणाचे तक्रारकर्ते दत्ता शिर्के यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
Embed widget