Nashik Crime News: जुन्या भांडणाचा वाद टोकाला, दोन जणांनी एकाला डोक्यात कोयत्याने वार करून संपवलं, नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Nashik Crime News: नाशिकच्या अंबड परिसरात एका 26 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime News : नाशिकच्या अंबड (Ambad) परिसरात शनिवारी रात्री एका 26 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत भदाने असे मृत युवकाचे नाव आहे. (Nashik Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून ही थरारक हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघा अज्ञात हल्लेखोरांनी प्रशांतच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रशांत खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, मात्र ते पळताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांकडून (Police) त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कोयता गँगची दहशत वाढली
नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून 'कोयता गँग'च्या वाढत्या हालचाली नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक ठिकाणी कोयत्याचा वापर करून हल्ले, दहशतीचे प्रकार, आणि आता हत्या होऊ लागल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, या घटनेनंतर अंबड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
शस्त्र बाळगणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात
दरम्यान, नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे तसेच शस्त्रे घेऊन दहशत माजविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी व अंमलदार हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना एकजण वंजारी भवन चौक, भोरवाडी गाव येथे कोयता घेऊन फिरत असल्याने त्याला ताब्यात चेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरवाडी परिसरातील मनपा शाळा क्र. 76 च्या कंपाउंडजवळ विधिसंर्घषित बालक कमरेला धारदार लोखंडी कोयता लावून फिरत असल्याचे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर यांना बखबऱ्याकडून समजले. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर तो विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. विधिसंघर्षित बालकास पालकांसह अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























