एक्स्प्लोर

Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News :गंगापूररोड परिसरातून ओळखीतील संशयितांनी मित्राला हत्याराचा धाक दाखवून जबरीने गाडीवर बसविले आणि राजीवनगर परिसरात नेत बेदम मारहाण केली.

नाशिक : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गंगापूररोड (Gangapur Road) परिसरातून ओळखीतील संशयितांनी मित्राला हत्याराचा धाक दाखवून जबरीने गाडीवर बसविले आणि राजीवनगर (Rajivnagar) परिसरात नेत बेदम मारहाण केली. त्यावेळी त्याचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता संशयितांनी त्याच्या डोक्यात कोयता मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकच्या (Nashik Crime News) गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन जाधव, रोहन नामदास, अनिकेत उर्फ अंड्या शार्दुल, अजय कापसे (सर्व रा. गोवर्धन, गंगापूर गाव) असे संशयितांची नावे आहेत.

याबाबत सनी खंडू जाधव (19, रा. राजवाडा, गंगापूर गाव) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्याच्या ओळखीतील संशयित चौघांनी सनीला धारदार हत्याराचा धाक दाखविला आणि गाडीवर बसविले. त्यानंतर त्यास राजीवनगर परिसरात नेत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात मारला कोयता

भावाला नेल्याची माहिती मिळताच सनीचा लहान भाऊ समीर त्यास सोडविण्यासाठी पोहोचला. त्यावेळी संशयितांनी त्यालाही मारहाण सुरू केली. तर एकाने त्याच्या डोक्यातच कोयता मारून गंभीर दुखापत केली. तसेच पायांवर दगडाने मारत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी समीरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

संशयित रेकॉडवरचे गुन्हेगार

संशयित रोहन नामदास याच्याविरोधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा तर, अनिकेत उर्फ अंड्या याच्याविरोधात गंगापूर पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याचे यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. चौघांपैकी दोघे रेकॉडवरचे गुन्हेगार आहेत. मागील वादातून हे अपहण व प्राणघातक हल्ला झाल्याचे समजते. 

उपनगरमध्ये गुंडांचा हैदोस 

दरम्यान, शहरातील काही स्थानिक गुंडांनी रहिवाशांनी किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी उकळण्यासाठी दबाब आणल्याचे प्रकार वाढत आहेत. उपनगर हद्दीत अशाच स्वरुपाचे दोन गुन्हे घडले असून सराईतांनी एका पाणीपुरी विक्रेत्यासह ट्रॅव्हल्स व्यावसायिकास धमकावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघेही गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

आणखी वाचा 

Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Dasara Melava : टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
Aaditya Thackeray Dasara Melava:  ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर : मावळतीच्या किरणांच्या साक्षीने करवीर संस्थानचा शाही दसरा संपन्न
कोल्हापूर : मावळतीच्या किरणांच्या साक्षीने करवीर संस्थानचा शाही दसरा संपन्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Banugade Patil Dasara Melava Speech : बानगुडे पाटील गरजले-बरसले,मेळाव्यातील पहिलंच भाषण स्फोटकSuraj Chavan Meet Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसलेAnil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणारSuraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Dasara Melava : टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
Aaditya Thackeray Dasara Melava:  ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
डायमंडच... रतन टाटांचं 1100 हिऱ्यांनी बनवलं हिरेजडीत पोट्रेट; सूरतच्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर : मावळतीच्या किरणांच्या साक्षीने करवीर संस्थानचा शाही दसरा संपन्न
कोल्हापूर : मावळतीच्या किरणांच्या साक्षीने करवीर संस्थानचा शाही दसरा संपन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
Raj Thackeray: संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Embed widget