Nashik : दोन कोटींचे कर्ज काढून देण्याचे आश्वासन, शेतकऱ्याला अडीच लाखांना चुना, नाशिकमधील घटना
Nashik Crime News : वित्तीय संस्थेमधून अॅग्रो टूरिझमकरिता दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आश्वासन देऊन एका शेतकऱ्याची सुमारे अडीच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
Nashik Crime News नाशिक : नाशिकमधून एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वित्तीय संस्थेमधून अॅग्रो टूरिझमकरिता (Agro Tourism) दोन कोटी रुपयांचे कर्ज (Loan) काढून देतो, असे आश्वासन देऊन एका शेतकऱ्याची सुमारे अडीच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश भाऊसाहेब माळोदे (Ganesh Malode) (रा. आडगाव, ता. जि. नाशिक) असे फसवणूक (Cheating) झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुधीर चव्हाण (Sudhir Chavan) याने मुलुंड येथील ब्रिज असोसिएट्स या वित्तीय संस्थेकडून शेतीमध्ये अॅग्रो टूरिझमकरिता दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आश्वासन देऊन माळोदे यांच्या शेतजमिनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनविणे, तसेच ऑडिट रिपोर्ट, तसेच प्रॉपर्टीज् मॉर्गेज डिडकरिता 3 लाख 65 हजार रुपयांची मागणी केली.
दोन लाख 65 हजार रुपये दिले धनदेशाद्वारे
त्याप्रमाणे माळोदे यांनी अॅक्सिस बँकेचा दीड लाखाचा धनादेश व 2 लाख 15 हजार रुपयांचा धनादेश, सात-बारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट ही मूळ कागदपत्रे मित्र कुंदन चौधरी (रा. गीता संकुल, कृष्णनगर, नाशिक) याच्या घराजवळ दिले.
पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
त्यानंतर आरोपी सुधीर चव्हाण याने हे धनादेश वटवून पैसे काढून घेतले व कर्जमंजुरीचे सॅक्शनपत्र माळोदे यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले. मात्र कर्जाची रक्कम दिली नाही म्हणून माळोदे यांनी मूळ कागदपत्रे व 3 लाख 65 हजार रुपयांची मागणी केली असता चव्हाण याने फक्त एक लाख रुपयांची रक्कम माळोदे यांना फोन पे द्वारे दिली व उर्वरित रकमेची मागणी केली असता आरोपी चव्हाण याने 2 लाख 65 हजार रुपये परत न करता माळोदे यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) सुधीर चव्हाण विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून ३५ हजार लुटले
दारू पिण्यासाठी व जेवणासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चार जणांच्या टोळक्याने एका मजुराच्या खिशातील 35 हजार रुपये बळजबरीने काढून घेत जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रोशन राजेंद्र कुमावत, आदित्य नाईक, प्रथमेश कुंदलवाल या तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime News: मोठी कारवाई! किराणा दुकानातून तब्बल 4 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त, दुकानदाराला अटक