एक्स्प्लोर

Crime News: मोठी कारवाई! किराणा दुकानातून तब्बल 4 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त, दुकानदाराला अटक

उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचं ड्रग्स जप्त केलं

ठाणे : निवडणूक काळात पैसा आणि दारुंचा धुरळा उडत असतो, अनेकदा गावागावात कार्यकर्त्यांच्या पार्ट्यांची मैफील जमत असते. मात्र, निवडणूक (Election) काळात पोलीस यंत्रणाहीअतिशय सतर्क असते. त्यामुळेच, अवैध दारुवाहतूक असेल, अमली पदार्थांची वाहतूक असेल किंवा बेहिशोबी मालमत्ता असेल, पोलिसांची करडी नजर असते. पोलिसांकडून (Police) कसोशीने तपासयंत्रणा राबविण्यात येते. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येतात.आता, कल्याण क्राईम ब्रांचच्या (Kalyan) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका किराणा दुकानातून तब्बल साडे चार कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या घटनेनं अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  

उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचं ड्रग्स जप्त केलं असून ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्स डीलर अद्यापही फरार आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली. 

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खबऱ्याकडून समजली. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रँचने तत्काळ या किराणा दुकानात धाड टाकत 3 किलो एमडी जप्त केले, या एमडी ड्रग्जची किंमत 4 कोटी 52 लाख 29 हजार रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, कल्याण क्राईम पोलिसांनी आरोपी दुकानदार राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला बेड्या ठोकले आहेत. तर, मुख्य आरोपी शैलेंद्र राकेश अहिरवार हा फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह उपगनगरातील अंमली पदार्थांच्या घटनांमुळे तरुणाई कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, विशेषत: एमडी मोफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं जात आहे. 

हेही वाचा

BJP: संविधान बदलायचंय म्हणणाऱ्या खासदाराचं भाजपने तिकीट कापलं, 2019 ला होतं 4 लाखांंचं मताधिक्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget