मोठी बातमी : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींचा मोठा खुलासा!लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गरीब मुलांची दिशाभूल, हल्ला करण्यासाठी अनुजवर दबाव
Salman Khan vs Bishnoi Gang : लॉरेन्स बिष्णोई गँग गरीब मुलांची दिशाभूल करून त्यांना आर्थिक मदत करून आपल्या टोळीत सहभागी करून घ्यायचे, असा मोठा खुलासा आरोपींनी पोलिस तपासात केला आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) गोळीबार प्रकरणातील (Firing Case) आरोपींनी पोलिसांकडे मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँग (Lawrence Bishnoi Gang) गरीब मुलांची दिशाभूल करुन त्यांना टोळीत सामील करुन घ्यायचे. नंतर त्यांना आर्थिक मदत करुन वाईट कृत्य करण्यास दबाव टाकायचे आणि तसे न केल्यास जीव मारण्याची धमकी द्यायचे, असा खुलासा आरोपींनी केला आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गरीब मुलांची दिशाभूल
लॉरेन्स बिष्णोई गँग गरीब मुलांची दिशाभूल करून त्यांना आर्थिक मदत करून आपल्या टोळीत सहभागी करून घ्यायचे. टोळीत सहभागी केल्यानंतर त्यांना गैरकृत्य करण्यास दबाव टाकायचे, काम करण्यास नकार दिल्यास धमकावत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींचा मोठा खुलासा
आरोपी सागर पाल हा 2022 मध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. काही कामानिमित्त तीन ते चार वेळा बिष्णोई गँगकडून पालला आर्थिक मदत करण्यात आली. जानेवारी महिन्यामध्ये सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुंबईत जाऊन राहण्यास सांगितल. यातील सागर पाल याला ज्यावेळी बिष्णोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार करण्यास सांगितलं, त्यावेळी त्याने सुरgवातीला नकार दिला. त्यानंतर बिष्णोई गँगने केलेल्या आर्थिक मदतीची जाणीव करून देत, त्याचावर दबाव टाकण्यात आला. हे काम न केल्यास कुटुंबाला आणि त्याला बघून घेण्याची धमकी दिली गेली, असंही आरोपींनी सांगितलं आहे.
अनुज थापनवर गोळीबार करण्यासाठी दबाव
आरोपी अनुज थापन यालाही यापूर्वी अशाच प्रकारे टोळीत सहभागी करून घेतले. मात्र अटकेनंतर अनुजने बिष्णोई गँगकडून करण्यात आलेली फसवणूक आणि दबाव या विषयी पोलिसांसमोर माहिती दिली. अनुजला या पूर्वीही तीन गुन्ह्यात स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याला सोडवायला गँगने कुठलेही प्रयत्न केले नव्हते. सलमान खान गोळीबार प्रकरणातही अशाच प्रकारे बिष्णोई गँगकडून मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :