तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात 3 शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Nashik Crime : नाशकातील (Nashik) सिन्नर (Sinnar) तालुक्यात तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळे (Vadgaon Pingale) येथील घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेजारच्या विहिरीत कासव असल्याचे सांगत मुलांना विहिरीत ढकलण्यात आले आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शेजारच्या विहिरीत कासव असल्याच सांगितले आणि विहिरीत ढकलून दिले
अधिकची माहिती अशी की, नाशकातील सिन्नर तालुक्यात 3 शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संशयित अमोल लांडगे याने तिघा शाळकरी मुलांना शेजारच्या विहिरीत कासव असल्याच सांगितले आणि विहिरीत ढकलून दिले. त्यातील एकांने विहीरीतील दोरीला पकडून स्वतः सावरत इतर दोघांचा जीव वाचवला आहे. संशयित अमोल लांडगे, विक्रम माळी, साईनाथ ठमके यांनी या तिघांना विहिरीत लोटून दिले.
मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून दिल्याचा अंदाज
दरम्यान, प्रसंगातून वाचून घरी आल्यानंतर तीन शाळकरी मुलांनी घरी आई-वडिलांना संपूर्ण कैफियत सांगितली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे या संशयिताला घेतले ताब्यात, अधिकचा तपास सुरू आहे. तिघा शाळकरी मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या