एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....

Mumbai News: मुलुंड परिसरात राहणाऱ्या खुशाल दंड यांनी त्यांच्या बिल्डिंगमधील महिलेने धमकी दिल्यामुळे लोकल ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई: उपनगरातील मुलुंड परिसरात एका 67 वर्षीय जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुशाल दंड (वय 67) असे या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीमधील पार्किंगवरुन झालेल्या भांडणातून विनयभंग (Molestation Crime) केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन, अशी महिलेने धमकी दिल्याने खुशाल दंड यांनी लोकल ट्रेनखाली (Mumbai Local Train) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

ते आणि या प्रकरणातील आरोपी कुमकुम मिश्रा या मुलुंड पश्चिमेला (Mulund News)  असणाऱ्या मनीषा प्राईड इमारतीमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये पार्किंगवरुन वाद झाला होता. यात कुमकुमने दंड यांना मारहाण करीत धमकावले होते. तसेच दंड यांना मी पोलिसांत तुमच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करेन, अशी धमकीही दिली होती. या घटनेनंतर खुशाल दंड प्रचंड अस्वस्थ झाले होते. याच ताणातून खुशाल दंड यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनखाली आत्महत्या केली.

याप्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच कुमकुम मिश्राला अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. 

पार्किंगसारख्या क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण, त्यात महिलेने विनयभंग केल्याची दिलेली धमकी यामुळे धक्का बसलेल्या दंड यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले. यामुळे आता त्यांची पत्नी एकटी पडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नक्की काय घडलं?

खुशाल दंड आणि कुमकुम मिश्रा यांच्यात पार्किंगवरुन वाद झाल्यानंतर मिश्रा यांनी 7 ऑगस्टला दंड यांना लिफ्टपाशी गाठले. यावेळी कुमकुम मिश्रा यांनी दंड यांना डास मारण्याच्या रॅकेटने मारहाण केली. खुशाल दंड यांची बायपास सर्जरी झाली असून त्यांना पेसमेकर लावण्यात आला आहे. लिफ्टमध्ये कुमकुम मिश्रा यांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दंड यांना दिली. त्यामुळे दंड प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांच्या छातीत दुखायला लागले. काहीवेळानंतर ते शांत झाले.

मात्र, 7 ऑगस्टला खुशाल दंड पहाटे पाच वाजता नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले. ते बराचवेळ होऊन घरी आले नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. यादरम्यान पहाटे साडेपाच वाजता मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोलिसांना एक मृतदेह सापडला. पोलिसांनी दंड यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, खुशाल दंड हे रेल्वे ट्रॅकवर जाऊन खाली बसले. लोकल ट्रेनच्या मोटरमनने त्यांना पाहून इमर्जन्सी ब्रेक मारले. मात्र, तरीही ट्रेन वेळेत थांबली नाही आणि त्याखाली येऊन दंड यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget