एक्स्प्लोर

नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, तेलंगणा, महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित लोक ताब्यात 

Nanded News Updat : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामधील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय.

Nanded News Updat : महाराष्ट्र - तेलंगणा राज्य सीमेजवळ भोकर तालुक्यातील किनी जवळ एका बंद राईस मिलमधील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकलीय. या कारवाईत 17 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून 16 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आलाय. 

भोकर पोलिसांना तेलंगणा सीमेवर जुगार चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असलेल्या 17 जणांना अटक करण्यात आली. तर घटनास्थळावरून पोलिसांनी 16 लाख 82 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईने जुगाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Nanded News Updat : दोन्ही राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

भोकर तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी अनेत जण तेथे जुगार खेळत अल्याचे आढळून आले. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले आहेत. या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Nanded News Updat : नक्की काय झालं? 

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामधील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून भोकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड, ज्ञानेश्वर सरोदे, चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड, प्रकाश वावळे आणि महिला पोलिस नायक सिमा वच्छेवार यांच्या पथकाने 27 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी किनी गावच्या बंद राईस मिलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली. घटनास्थळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा  जुगार खेळताना घटनास्थळी मिळून आले. यावेळी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी या जुगार अड्ड्यावर करवाई केली या कारवाईत जुगाऱ्यांकडून रोख 1 लाख 600 रुपये, 16 किमती मोबाईल, 7 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनासह जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 16 लाख 82 हजार 770 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Nanded News Updat : यांना केली अटक? 

संजीव रेड्डी ( रा. किनी ता. भोकर ) या जुगार अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीसह संतोष खलशे (रा. दहेगाव), गणेश कदम ( रा. निघवा), श्रीनिवास जाधव (रा. रंजणी) ,राजकुमार बालिजापल्ली, आनंद राठोड (रा. डोडरणा ) अंकाम रा.भोशी, मल्लेश नारडे (रा. कुबेर), बालाजी घोसालवाड (रा. बोळासा), विठ्ठल गोपवाड (रा. गोडसरा), देविदास येनकुसाब (रा. निघवा), गजराज पळसे (रा. पळशी), सत्यनारायण शिंदे (रा.दहेगाव), सुरेश ठाकूर (रा.पळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण तेलंगणा राज्यातील आहेत. तर श्रीनिवास कदम (रा. लगळूद), गोविंद जाधव (रा. महागाव), दिलीप जाधव (रा. लगळूद ) अशी अटक करण्यात आलेल्या नांदेड लांकांची नावे आहेत.  

पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या बंद राईस मिलच्या मालकासह वरील 17 जुगाऱ्यांविरुद्ध  जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Mumbai Crime News: माणुसकीला काळीमा! 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; किरीट सोमय्यांचा संताप, थेट पोलीस स्टेशन गाठलं, म्हणाले, 'मुंबईकरांवर लांच्छन...'
माणुसकीला काळीमा! कांदिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; किरीट सोमय्यांचा संताप, थेट पोलीस स्टेशन गाठलं, म्हणाले, 'मुंबईकरांवर लांच्छन...'
Thane Crime Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ठाण्यातील मेहता बिल्डरला चौकशीला बोलावलं, पूर्णेकरांचा मुलगाही पोलीस स्टेशनला पोहोचला
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ठाण्यातील मेहता बिल्डरला चौकशीला बोलावलं, पूर्णेकरांचा मुलगाही पोलीस स्टेशनला पोहोचला

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget