एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Labour Accident : निष्पाप नऊ मजुरांना चिरडणाऱ्या कारचा अवघ्या तीन तासांच्या आत लागला छडा; नागपूर पोलिसांनी दिली तपासाची माहिती

Nagpur Labour Accident : मध्यरात्रीच्या सुमारास निर्जन रस्त्यावर 9 मजुरांना चिरडणाऱ्या कारचा आणि पसार झालेल्या आरोपींना नागपूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोध घेऊन आरोपींना अटक केली आहे.

Nagpur Accident News नागपूर :  फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार रविवारच्या रात्री नागपूरात घडला. निर्जनस्थळी निष्पाप नऊ मंजूर रात्री गाढ झोपेत असताना मद्यधुंद सात तरुणांच्या गाडीने अक्षरक्ष: त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. यात दोन जण जागीच ठार झाले असून एका चिमुकल्यासह 7 जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेमुळे शहर पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाने हादरले आहे. मध्य रात्रीच्या सुमारास निर्जन रस्त्यावर अंधारात मजुरांना चिरडणाऱ्या (Nagpur Accident) या कारचा शोध घेऊन आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे काम नव्हतं. शिवाय कुठल्याही सीसीटिव्ही फुटेजचा आधार नसताना नागपूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. एकीकडे या घटनेमुळे समाजातून रोष व्यक्त होत असतांना दुसरीकडे नागपूर पोलिसांच्या कामगिरीचेही कौतुक केल्या जात आहे.

पोलिसांनी लावला अवघ्या तीन तासांच्या आत छडा

या प्रकरणाच्या तपासाबाबत अधिक माहिती देताना  झोन 4 चे उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपींना शोधणे, तसेच त्यांचे वाहन शोधून काढणं, हे मोठे आव्हानात्मक काम होतं. शिवाय परिसरात कुठेही सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नव्हते. अपघात झाल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी या परिसरातील पाहणी केली. दरम्यान, या गाडीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने आम्ही काही सुगावा लागतो का, अशी तपासणी केली असता तेथे काही गाडींचे तुटलेले पार्ट्स आढळून आले. नंबर प्लेटची देखील काही तुकडे घटनास्थळी आढळून आले.

सुरुवातीला हे पार्ट संपूर्ण परिसरात विखुरलेल्या अवस्थेत होते. मात्र हे पार्ट जोडल्यानंतर त्यातली माहिती पुढे येऊ शकली.  तसेच काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी उपलब्ध होते त्यांच्या माहितीवरून आम्ही या अपघातातील कारचालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वाहनाचा मिळालेला पुरावा आणि गाडीचा कलर यावरून आम्ही आरोपींपर्यंत पोहोचू शकलो. परिणामी यातील सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सध्या सुरू आहे. अशी माहिती उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे.  

2 मजुरांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ रविवारच्या मध्यरात्री या भीषण अपघाताची घटना घडली. यात  एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले. धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला. तर  सात जण गंभीर जखमी झालेत. यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

आरोपींना कठोर शिक्षा होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. या घटणेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Embed widget