एक्स्प्लोर

Nagpur News: बलात्कार प्रकरणातील आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न; हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील खळबळजनक घटना 

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने दुर्घटना टळली आहे.

नागपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने ही दुर्घटना टळली आहे. शेख तौसीफ शेख फैजान असे या 23 वर्षीय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.  तो नागपूरच्या शहंशाह चौक, मोठा ताजबाग येथे राहतो. या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.  

आधी अपहरण, मग बलात्कार आणि अखेर आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात तौसिफला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख तौसीफने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान तौसीफने अनेक आश्वासन देत आपण लग्न करू असे देखील सांगितले. त्यामुळे पीडित मुलीने तौसीफवर विश्वास दर्शवला आणि ती मुलगी शिक्षण सोडून तौसीफच्या प्रेमात बुडाली. तसेच या संधीचा फायदा घेत तौसीफने तिला पळून जाऊन लग्न करण्याचे देखील आमिष दाखवले.

गेल्या आठवड्यात पीडित मुलीचे आईवडील मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर तौसीफने तिला घरातून पळवून नेले. कालांतराने ही बाब आई वडिलांच्या लक्षात आल्यावर मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान 21 जानेवारीला मुलगी तौसीफसोबत सापडली. त्यानंतर पोलिसांनी  तौसीफला अटक करून त्याला न्यायालयात नेले असता  दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

मोठी दुर्घटना टळली

दरम्यान, 22 जानेवारीच्या संध्याकाळी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर तायडे हे नेहमीप्रमाणे लॉकअप ड्युटीवर (गार्ड ड्युटी) होते. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तपास अधिकारी आठवले यांनी तौसिफला तपासासाठी कोठडीतून बाहेर काढले. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान  त्याला परत लॉकमध्ये टाकले. त्यावेळी रात्री दहा-साडे दहाच्या सुमारास तायडे यांना लघुशंका आली. त्यांनी सहकाऱ्यांना तौसिफकडे लक्ष देण्यास सांगून ते लघुशंकेला गेले.

याचदरम्यान तौसिफने ब्लॅकेटची कापडी किनार उसवली. ती लोखंडी सळाखीला बांधून गळफास घेतला. मात्र तो प्रकार सहकाऱ्यांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली. आवाजाने उपनिरीक्षक माधव गुंडेकर, अंकुश वाळके, नरेश डवरे तसेच तायडे यांनी कोठडीकडे धाव घेतली. तायडे यांनी चावीने कोठडीचे कुलूप उघडले आणि तत्काळ फास काढून तौसिफला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी तौसिफविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

इतर महत्वाची बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Zoho : अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
Navdurga 2025 : आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
Heart Attack or Acidity:  हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
Embed widget