एक्स्प्लोर

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील वाढ सुरुच आहे. सप्टेंबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात 10 हजारांपेक्षा अधिक रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. सोने आणि चांदीच्या दरानं वा उच्चांक गाठला आहे. सणांचा कालावधी सुरु होत असताना सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 1343 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 1181 रुपयांची वाढ झाली. आज सकाळी जीएसटीशिवाय सोन्याचा दर 113498 रुपये होता. तर, चांदीचा दर 134050 रुपये होता. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 116902 तर एक किलो चांदीचा दर 138071 रुपये आहे. हे दर इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेले आहेत. ते दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर करतात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता दर जाहीर करता.

सप्टेंबर महिन्यात एक तोळे सोन्याचा दर 11110 रुपयांनी वाढला आहे. चांदीचे दर प्रति किलो 16478 रुपयांनी वाढले आहेत. आयबीजेएच्या दरांनुसार 31 ऑगस्टला सोन्याचा दर 102388 प्रति तोळा तर चांदीचा दर 117572 रुपये किलो होता.

कॅरेटनिहाय सोन्याचे दर (Gold Rate Update)

23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याच्या दरात 1338 रुपयांनी वाढून 113044 रुपयांवर पोहोचला. जीएसटीसह याचा दर 116435 रुपयांवर पोहोचला आहे.हे मेकिंग चार्जेस शिवायचे दर आहेत.

22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 1230 रुपयांची वाढ झाली असून एका तोळ्याचा दर 103964 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 107082 रुपयांवर पोहोचला आहे.

18 कॅरेट सोन्याचा दर 1008 रुपयांनी वाढून 85124 रुपयांवर पोहोचला असून जीएसटीसह याचा एका तोळ्याचा दर 87677 रुपयांवर पोहोचला आहे.

14 कॅरेट सोन्याचा दर 785 रुपयांनी वाढून 66396 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह एका तोळ्याचा दर 68387 रुपयांवर पोहोचला आहे.

2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ

सराफा बाजारात सोन्याचे दर 37758 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 48033 रुपयांनी माहगले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 75740 रुपये होता. तर, चांदीचा एक किलोचा दर 86017 रुपये होता.

दरम्यान, केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते सोने आणि चांदीच्या दरातील तेजी कायम राहील. फेडची दर कपात, डॉलरची कमजोर वाटचाल, भूराजनैतिक संघर्ष, अमेरिकेतील नोकऱ्यांचा डेटा, केंद्रीय बँकांकडून होणारी सोने खरेदी आणि सणांचा हंगाम या कारणांमुळं सोन्याचे दर वाढतील. ईटीएफची खरेदी देखील सुरु आहे. भारतीय रुपया कमजोर होणं आणि देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमजोर संकेतामुळं सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोने दर वाढीमुळं सोन्यातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget