एक्स्प्लोर

Thane Crime : मुरबाडमध्ये जुन्या वादातून भर चौकात एकाची हत्या, कुऱ्हाडीने डोक्याचे दोन भाग करुन संपवले

Murbad Jambhurde Murder : आरोपीने एका व्यक्तीच्या अंगावर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली. हा प्रकार इतका भयंकर होता की त्यामुळे जांभुर्डे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

ठाणे : मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे येथे (Murbad Jambhurde Murder) भालचंद्र बिऱ्हाडे (वय 52) या व्यक्तीची पूर्ववैमनस्यातून गावातीलच तरूणाने  भर चौकात सर्वांसमक्ष कुऱ्हाडीने अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश भोपी असं आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जाभुंर्डे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले 

मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील भालचंद्र बिऱ्हाडे आणि गणेश भोपी यांच्यात पूर्वीपासून वैर होतं. शनिवारी भालचंद्र बिऱ्हाडे हा आपले घरातून बाहेर पडत असताना गावाच्या चौकात असलेल्या रिक्षा स्टँडवर दबा धरून बसलेला गणेश याने त्याच्या डोक्यावर आणि अंगावर धारदार कुऱ्हाडीने घाव घातला. यामध्ये भालचंद्र बिऱ्हाडेचा मृत्यू झाला.

हा प्रकार एवढा भयानक  होता की हल्ला करणाऱ्या गणेशला आवरायला कुणीही पुढे आले नाही. अखेर लोकांचा जमाव जमताच गणेशने त्या ठिकाणाहून पळ काढला. ही घटना मुरबाड पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गणेशला शोधण्यासाठी परिसर पिंजून काढला. पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, गणेशच्या सोबतीला कोण कोण होते, या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे, तसेच भालचंद्र आणि गणेशचा वाद कशामुळे विकोपाला गेला याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश शिंदे, पोलिस निरीक्षक संदिप गिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव खोमणे हे करत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Embed widget