एक्स्प्लोर

मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड

बनावट वेबसाइट बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर करवाई केली आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं केलेल्या कारवाई दरम्यान लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी एचपी गॅसची एजन्सी मिळवून देण्याची बतावणी करून बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे विविध राज्यातील लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

देशभरातील 10 हजार नागरिकांना या टोळीनं लुबाडल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे. या आरोपींनी वेबसाइटवरून देशातील वेगळ्या राज्यातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे अमिष दाखवून अनेकांनी फसवणूक केली. बिहार ,पश्चिम बंगाल राज्यातून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे. गॅस एजन्सीच्या नावाखाली आरोपी इच्छुक नागरिकांना बनावट वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी ई-मेलद्वारे बनावट बनवण्यात आलेली कागदपत्र पाठवत होते. यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग करून वेगवेगळी आमिषे दाखवून आरोपी नागरिकांकडून लाखो रुपये उकळत होते. आतापर्यंत या आरोपींनी देशभरात 10531 नागरिकांना 10 कोटी 13 लाख रुपयांचा चुना लावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बनावट पद्धतीने बनवण्यात आलेल्या वेबसाईटवर लोकांचा विश्वास बसावा म्हणून बजाज फायनांस, बजाज इन्स्टंट लोन, पेट्रोल पंप डीलरशिप, नापतोल, रिलायन्स टॉवर यांसारख्या बनावट जाहिराती देखील ही टोळी चालवत होती.

पाहा व्हिडीओ : एचपी गॅस एजन्सी मिळवून देण्याचं आमिष, देशातील 10 हजार नागरिकांची फसवणूक

सदर आरोपींनी htpp://Lpgvitrakchayan.net आणि htpp://allindaidelearship.in या बनावट वेबसाईट बनवल्या होत्या. 2018 पासून ही टोळी कार्यरत होती. या टोळीने अशा तब्बल 125 बनावट वेबसाईट बनवल्या आहेत. त्यापैकी काही वेबसाईट अजूनही अॅक्टिव्ह आहेत. इतर बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरु आहे. याप्रकरणी 6 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं बिहार, वेस्ट बंगाल आणि रत्नागिरीमधून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
बीडमध्ये संतापजनक घटना, महिलेचं अपहरण; घरात घुसून दिवसाढवळ्या कारमध्ये टाकलं, पोलिसांमुळे सुटका
बीडमध्ये संतापजनक घटना, महिलेचं अपहरण; घरात घुसून दिवसाढवळ्या कारमध्ये टाकलं, पोलिसांमुळे सुटका
Pandharpur News: पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना मोठा अनर्थ घडला; ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकले; एकाचाही शोध लागेना, NDRF टीमच्या मदतीची प्रतीक्षा
पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना मोठा अनर्थ घडला; ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकले; एकाचाही शोध लागेना, NDRF टीमच्या मदतीची प्रतीक्षा
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Rupali Patil Thombare : ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
IND vs NZ 5th ODI : अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
Embed widget